तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील सुपुत्र चंद्रकांत भाकरे शहीद ….मुळगावी पातुर्डा येथे करण्यात आला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बुलडाणा:- 20

काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढतांना बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) हे जवान शहिद झाले आहे त्यांच्या मूळ गावी पातुर्डा येथे आज 20 एप्रिलला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
काश्मिरमधील बारामुल्ला जिल्हयातील सोंपारे येथे दहशतवाद्यांशी लढतांना CRPF चे तीन जवान शहीद झाले यातील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) हे बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा या गावचे जवान आहेत शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांचा पार्थिव मुळगाव असलेल्या पातुर्डा येथे आणण्यात आले त्यावेळी गावकर्‍याने अमर रहे अमर रहे चंद्रकांत भाकरे अमर रहे …. भारत माता की जय अशा घोषणा ही यावेळी दिल्या गेल्या गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली या अंतयात्रेमध्ये पातुर्डा येथील ग्रामस्थ सहभागी झाले बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन शासनाच्यावतीने आदरांजली वाहिली यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा आमदार संजय कुटे यांनी ही पुष्पचक्र वाहिले त्यांनतर आज 20 एप्रील रोजी सकाळी 9 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणार आले या अंत्यविधीच्या कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्टेंसीचे पालन करण्यात आले
शहीद चंद्रकांत भाकरे यांना पाच वर्षाची मुलगी दिव्या व तीन वर्षाचा मुलगा कुश पत्नी आई वडील आणि भावंड असा आप्त परिवार आहे.


 जमील पठाण
8804935111 / 8805381333

No comments:

Post a comment