तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

अध्यक्ष आणि गेवराई वकील संघातर्फे मुख्यमंत्री निधी करीता २२ हजार सुपूर्द


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २१ _ कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्राची जनता आणि राज्य सरकार निकराने लढा देत असताना आपला सुद्धा काही मदतीचा सहभाग असावा या भावनेने अध्यक्ष आणि गेवराई वकील संघातर्फे मुख्यमंत्री निधी करीता २२ हजार रुपये सुपूर्द करण्यात आला.
           विशेष बाब म्हणजे वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कमलाकर देशमुख यांनी वकील संघातर्फे दिलेल्या ११ हजार रुपयांच्या मदती बरोबरच व्यक्तीश: स्वत: चे  पुन्हा ११ हजार असा एकूण २२ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी गेवराईचे तहसीलदार धोंडिबा गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कमलाकर देशमुख, उपाध्यक्ष अॅड. पांडुरंग जरांगे आणि सचिव अॅड. प्रदीप मडके आदी उपस्थित होते.

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

No comments:

Post a Comment