तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

'सरपंचा' कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्तासेवा देणाऱ्या पत्रकारांची दखल...
पत्रकारांना दिली घरपोच सुरक्षा सामग्री
 परतूर,दि.13 (प्रतिनिधी) -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारही सुरक्षित राहावेत या उद्देशाने वरफळ गावचे सरपंच नदीम पटेल यांनी सोमवारी शहरातील पत्रकारांच्या घरोघरी जाऊन सॅनिटायजर,ग्लोज,डेटॉल साबण व मास्क अशा विविध उपयुक्त वस्तूंचे वाटप केले. दरम्यान पटेल यांच्या या उपक्रमाचे स्थानिक पत्रकारांनी स्वागत केले आहे.
     कोरोना विषाणू व त्यापासून होणाऱ्य रोगापासून मुक्तता मिळावी यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत.सेवाभावी संस्था,  सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी,प्रशासन नागरिकांना सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.लॉकडाऊन करण्यात आल्याने जनजीवन ठप्प झाले आहे.रस्ते ओसाड पडले आहेत. व्यवहार थंडावले आहेत.परंतु अशाही परिस्थितीत पत्रकार मात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावीत आहेत.कोरोनाच्या बातम्या व इतर माहिती सविस्तरपणे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. याची जाणीव ठेवत वरफळ गावचे सरपंच नदीम पटेल यांनी सोमवारी शहरातील सर्व पत्रकारांच्या घरी जाऊन त्यांना आवश्यक त्या वस्तूंचे वाटप केले. यावेळी उपसरपंच अण्णासाहेब खंडागळे, वसीम सर, यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले प्रतिक्रिया........


०१)
कोरोना या विषाणूजन्य परिस्थितीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपल्या लेखणीतून सेवा देणाऱ्या पत्रकार मंडळींची दखल घेणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे म्हणून छोटासा प्रयत्न केला यापुढेही असे सामाजिक कार्य करत राहणार

     -------------- नदीम पटेल०२

देशातील तसेच राज्यातील पत्रकार ही आपली सेवा निःसंकोचपणे पार पाडत असतांना त्यांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे असतांना नदीम पटेल यांनी केलेल्या कार्याने नक्कीच तालुक्यातील पत्रकार यांचे मनोबल उंचावेल....

    ------श्यामसुंदर चित्तोडा


०३)
वर्तमानपत्रातील बातम्यांच्या माध्यमातून पत्रकार अनेकांच्या कार्याची दखल वेळोवेळी घेत असतात. मात्र सरपंच नदीम  पटेल यांनी समाज भान ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र वार्तासेवा देणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन  आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले आहे. 

-- आशिष गारकर

No comments:

Post a comment