तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान ; नागरिकांची वर्दळ वाढल्याने संचारबंदी शिथिलतेची वेळ बदललीबीड (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदी शिथिलतेच्या वेळेसाठी सम-विषम तारखेचा फॉर्म्यूला अंमलात आणला. परंतु हा फॉर्म्यूला सपशेल फ्लॉप ठरला. अनेक शहरात गर्दी उसळल्याने जिल्हाधिकार्‍यांनी आता संचारबंदी शिथिलतेची वेळ बदलली आहे.
   जिल्हाधिकार्‍यांनी आज (दि.8) दिलेल्या आदेशात पुढे म्हटल्यानुसार,  सम-विषम तारखेचा फॉम्यूला निश्चित करुन दिला होता. परंतु, गर्दी वाढत असल्याने आज संचारबंदी शिथिलतेची वेळ बदलली आहे. त्यात संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्व जिवनावश्यक वस्तूंची किरकोळ विक्री करणार्‍या आस्थापना दि.9, 11, 13 या तारखेस सकाळी 7 ते 9.30 या वेळेत खुल्या राहतील. या काळात कोणत्याही स्वरुपात माल वाहतूक होणार नसल्याने वाहने (उदा.छोटा हत्ती, पिकअप) रस्त्यावर चालवता येणार नाहीत. तसेच, जिवनावश्यक वस्तूंसह सर्व घाऊक वितरण व दुकानदार यांची दि.9, 11, 13 या तारखेस सकाळी 6 ते 10.30 या काळात सुरु राहतील. या काळात देखील कोणत्याही प्रकारची वाहतूक करता येणार नाही. सर्व घाऊक वितरण व दुकानदार यांनी पोलीस विभागाकडून मिळालेले पास वापरून सर्व किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक वितरक, विक्रेते यांच्याकडून आवश्यक ते सामान दि.9, 11, 13 या तारखेस सकाळी 6 ते 10 या वेळ वगळून प्राप्त करुन घ्यावे. या सवलती वगळता इतर सर्व काळात संचारबंदी असणार आहे. दरम्यान, 11 शहरातील व्यापारी संघटनांनी दिलेली किराणा सामानाच्या वितरकांची यादी जोडली आहे. असे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात म्हटले आहे.
हे आहेत जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

No comments:

Post a comment