तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

शहरातील नागरिक गावात आणि गावातील शेतात भेटा परिसरात कोरोना ची भयावह स्थिती
लातूर (प्रतिनिधी)

औसा तालुक्यातील भेटा व अन्नसुरक्षा शेती परिसरातील महिला कोरोना या व्हायरसमुळे भयावह स्थितीत आहेत. दिवसे न दिवस महाराष्ट्रात कोरोना चा वाढता धोका पाहता खबरदारी म्हणून अनेक शहरवासियांनी गावाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे मागील काही दिवसात गावात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे संवाद सहाय्यक सुमन उद्धव माने, चॅम्पियन महिला उषा नामदेव शिंदे, प्रयागबाई सुखदेव चव्हाण, मीरा संजय भोकरे, आशा अमोल कांबळे, नंदा सुभाष कटारे व माधुरी नारायण ढोले लीडर महिलांची टीम गाव पातळीवर काम करत असताना म्हणजे ग्रामस्थांची जनजागृती व हात कसा धुवावा स्वच्छता याचे प्रशिक्षण देताना त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी भरारी सखी कृषी गट, सरस्वती सखी कृषी गट आणि रुक्मिणी सखी कृषी गट यांच्या अध्यक्ष व सचिव यांना सुचवले की ज्यांच्या शेतात लाईट, पाणी, भाजीपाला आणि दूध राहण्यासाठी व्यवस्था आहे. अशा कुटुंबांना शेतात वास्तव्यासाठी जाण्यास सांगणे तेव्हा तिन्ही सखी कृषी गटाच्या अध्यक्ष व सचिव यांनी 100 अल्पभूधारक शेतकरी महिलांना पर्याय दिला तेव्हा 10 कुटुंबाना हा पर्याय योग्य वाटला व जोपर्यंत कोरोना वायरस आजार कमी होत नाही तोपर्यंत शेतात राहण्याचे पसंद केले कोरोना गावात जरी आला तरी तो शेतात येणार नाही ही खात्री ग्रामीण भागातील कुटुंबांना वाटत आहे. भेटा येथील राजाबाई लोकरे, सुरेखा बचाटे, मीरा लोकरे, लता बचाटे, माधुरी ढोले, सुमन माने, सुमन भोकरे, भाग्यश्री ढोले, विद्या माने, कौशल्य माने ह्या कुटुंबानी शेतात वास्तव्य केले.
ग्रामीण भागातील अनेक नागरिक पुणे, मुंबई व हैदराबाद येथून आलेल्या लोकांकडे संशयाने पाहत आहेत. भेटा येथील आशा कार्यकर्ता व संवाद साहाय्यक गावात घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्य विषयाची माहिती घेत आहेत त्यावेळेस स्वतःची काळजी मास्क/रुमाल बांधून व सोशल डिस्टन्स करून करत आहेत. एखाद्या घरी बाहेरगावहून कोणी व्यक्ती आली का ते पाहत आहेत कोणाला सर्दी खोकला ताप असेल तर त्याची नोंद ठेवली जात आहे आणि दररोज चा रिपोर्ट आरोग्य केंद्रात व ग्रामपंचायत मध्ये कळविला जात आहे.
भेटा येथील सरपंच कविता शिवाजी ढोले दक्षता समिती अध्यक्ष यांनी शेतात 24 तास लाईट ठेवण्याची 33 के.व्ही. केंद्राला कळवली आहे. त्यामुळे 24 तास लाईटची व्यवस्था शेतात आहे गावातील 80 कुटुंबाला गहू तांदूळ वाटप केला आहे. त्यामध्ये प्रति माणसाला गहू 3 किलो आणि तांदूळ 2 किलो याप्रमाणे सध्या वाटप होत आहे.
स्वयं शिक्षण प्रयोगाच्या औसा तालुक्यातील ट्रेनर कौशल्या मंदाडे यांनी शेतात वास्तव्यास गेलेल्या 10 अल्पभूधारक शेतकरी महिलांना खरीप मधील कामे व पेरणीपूर्व मशागत कशा पद्धतीने करायची याबद्दल प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्या दहा कुटुंबांनी प्रतिक्रिया दिल्या त्या अशाप्रकारे शेतात राहिल्यामुळे खरिपातील कामे व उन्हाळी शेतातील कामे करण्यासाठी जास्त वेळ मिळत आहे व जास्त काम होत आहे. त्यासाठी बाहेरून मजूर लोक लावण्याची गरज नाही यामुळे वेळेची व पैशाची बचत झाली आहे

No comments:

Post a comment