तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

सरपंच राजेभाऊ फड यांच्या वतीने कन्हेरवाडीतील गरजुवंत नागरिकांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूमुळे नागरिक हैराण झाले आहेत. बीड जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर रासपाचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांच्या पुढाकाराने गावातील गोरगरीब तथा गरजूंवंत ग्रामस्थांना मोफत शिधा व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
        देशात आणि राज्यात कोरोना साथ आजाराने थैमान घातले आहे. सध्याच्या कोरोना साथजन्य आजारामुळे महाराष्ट्र पुर्णपणे बंद आहे. रोजगारासाठी कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने गोरगरीब लोक,शेतमजुर, सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.  कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कन्हेरवाडीतील  प्रत्येक गोरगरीब कष्टकरी मजुरांना गावातील प्रत्येक कुटुंबाला घर पोच  धान्य व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले आहे. या मधे ( तांदूळ ,साखर ,तेल ,मीठ ,मसाला ,हळद, चहा पुडा , साबण ) वाटप करण्यात आले. यावेळी राजेभाऊ फड यांच्यासह श्रीराम मुंडे, सतीश फड, भास्कर नाना रोडे, रामहरी फड, गुंडीबा फड, नाथराव  फड,  प्रल्हाद फड,  मिनिनाथ दादा फड, नवनाथ आप्पा फड, केरबा गवळी, प्रल्हाद पाटील, महादेव मामा मुंडे , नामदेव खांडे, दिनकर फड, सचिन मुंडे,  प्रदुम मुंडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या हस्ते जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे. सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळत या वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
        कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीच उत्तम पर्याय,  कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरीच रहा सुरक्षित रहा,ही संकटाची वेळ लवकर निघुन जाईल, प्रशासनाला सहकार्य करा तसेच आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन राजेभाऊ फड यांनी केले आहे.

No comments:

Post a comment