तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

शेती पूरक व्यवसाय व बँकिंग क्षेत्राला वेळ वाढवून देण्याची प्रा. टी.पी. मुंडे यांची मागणी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
लॉक डाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे शेती मशागतीची व व इतर कामेही खोळंबली आहेत ही कामे करण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांना दिलेल्या सवलतीचा वेळ अत्यंत अपुरा पडत आहे तो वाढवून द्यावा अशी मागणी लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


   लॉक डाऊन मुळे घोषित केलेल्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी एक दिवसा आड सकाळी  07 ते 9:30 या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे हीच सवलत शेतीच्या संबंधित कामांना देण्यात आली आहे परंतु या अत्यल्प वेळेत शेती औजाराची खरेदी- दुरुस्ती, रासायनिक खते व कीटकनाशके, कृषी पंप व पाईप खरेदी -दुरुस्ती ,ही कामे होत नाहीत.


    आपण दिलेल्या वेळात खेड्यातून शहरात येणे सुद्धा शक्य नाही त्याचा थेट परिणाम शेतीची कामे खरेदी -विक्रीचे आडत व्यवहार, शेती जोड धंद्याची कामे खोळंबली आहेत त्यामुळे सम- विषम तारखेप्रमाणेच एक दिवसा आड का होईना  त्याचा वेळ कमीत कमी 5 ते 6 तास ठेवावा तसेच मोटार मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिशन यांना काम करण्यासाठी तहसील कार्यालयांतर्गत ओळख पत्र देण्यात यावे.


    कृषी क्षेत्राबरोबरच च् बँकिंग व्यवहाराची वेळही वाढवून देण्याची मागणीही लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

    सध्या अपंग, निराधार,  परितक्त्या यांचे अनुदान खात्यात जमा झाले आहे नोकरदार व निवृत्त कर्मचारी यांचे वेतनही जमा झाले आहे परंतु बँक व्यवहाराचा वेळ खूपच कमी असल्याने पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे हाच वेळ सकाळी 7 ते 12 किंवा सकाळी 10 ते 2 असा करावा असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a comment