तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने व शिवसेना कार्यकर्ते शिवाजी दादा कुलकर्णी यांच्या सौजन्याने अंबाजोगाईत सर्व पत्रकारांना मास्क व सॅनिटाझर भेट


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-
      कोरोना सदृश्य परस्थिती लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदे च्या पुढाकाराने व शिवसेना कार्यकर्ते शिवाजी दादा कुलकर्णी यांच्या सौजन्याने अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकारांना मास्क व सॅनिटाझर भेट देण्यात आले.

   सर्व जगा सोबत जगातील सर्व पत्रकार बांधव ही आज कोरोना सदृश्य परस्थिती मधून मार्गक्रमण करत आसल्याने पत्रकारांनी ही आपली सुरक्षितता ठेवण आपल्याच हाती आहे हे ओळखल पाहिजे. त्या साठीच अंबाजोगाई शहरातील पत्रकारांच्या सरक्षितते साठी मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर व जिल्हा सरचिटणीस परमेश्वर गित्ते यांच्या पुढाकाराने व शिवसेना कार्यकर्ते शिवाजी दादा कुलकर्णी यांच्या सौजन्याने शहरातील सर्व पत्रकार बांधवाच्या सुरक्षेसाठी  मास्क व सॅनिटायझर भेट देण्यात आले. या वेळी सोशल डिस्टन्सचा वापर करत शिवाजी दादा कुलकर्णी यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना त्यांच्या स्वहस्ते मास्क व सॅनिटायझर भेट दिले या वेळी यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने दत्तात्रय अंबेकर यांनी कोरोनाच्या या संकट समयी प्रसंगावधान राखून शिवाजी दादा यांनी कुलकर्णी यांनी जे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले त्या बद्दल त्यांचे आभार मानले या वेळी स्थानिक अंबाजोगाई पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय दमकोंडवार, सचिव रणजित डांगे, तालुका पत्रकार संघाचे सचिव गोविंद खरटमोल, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष राम जोशी यांच्या सह सर्व पत्रकार बांधव, संजय साळवे, अमोल पौळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

   

No comments:

Post a comment