तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

मदतीसाठी फोन आला, आणी महिला टिम पोहचली मदतीसाठी गरीबांच्या झोपडीत.....
ज्योती ठाकरे देत गरजु महिलांना मदतीचा हाथ

लाॅकडाऊनच्या पार्श्वभुमीवर महिला टिम अॅक्शनमोडवर


वाशिम/मंगरुळपीर:-(फुलचंद भगत)-लाॅकडाऊनच्या कालावधीत गरजु महिलांना मदत लागल्यास संपर्क करन्याचे आवाहन समाजसेविका ज्योती ठाकरे आणी त्यांच्या महिला टिमने केल्यानंतर मंगरुळपीर तालुक्यातील बालदेव येथुन मदतीसाठी फोन येताच तात्काळ तहसिलदार यांची पुर्वपरवानगी घेवुन  किराणा भाजीपाल्यासह आवश्यक साहित्य घेवुन महिला टिम गरीबांच्या झोपडीत जावुन दाखल झाली.या बिकट परिस्थीतीत महिलांनी केलेल्या मदतीमुळे गरीबांचे डोळे पाणावले होते तर गरजुंना मदत करन्यातच आम्हाला समाधान मीळत असुन अशा कठीण वेळेत प्रत्येकांनी आपापल्या परिने गोरगरीबांना मदत करावी असे आवाहनही ज्योती ठाकरे आणी त्यांच्या महिला टीमने केले.
             कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाउनचा कालावधी वाढवन्यात आल्याने गरीबांना ऊदरनिर्वाहासाठी मोठा सामना करावा लागणार आहे.शासन सर्वतोपरी मदत करीतच आहे तरीही मंगरुळपीर तालुक्यातील महिलांना या कालावधित अडचन निर्माण झाल्यास सबंधित प्रशासनाची पुर्वपरवानगी घेवुन आणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक काळजी घेवुन व शासनाच्या नियमाच्या आधीन राहुन समाजसेविका ज्योतीताई ठाकरे आणी त्यांची महिला टिम ही मदत पोहचवणार आहेत त्यामुळे गरजुंनी मदतीसाठी संपर्क करन्याचे आवाहन ठाकरे यांनी केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत बालदेव येथील काही अत्यंत गरीब कुटुंबांना मदत हवी असल्याचे माहीत होताच तिथे जावुन त्या कुटुंबांना मदत करन्यात आली.
           सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन केलेले आहे. लॉकडाऊन असल्या मुळे सर्वसामान्यांच्या पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वसामान्य गरजु कुटुंबांना मदत व्हावी, सामाजिक बांधिलकी, माणुसकीचे नाते टिकावे या सेवाभावी वृत्तीने 'मदत नव्‍हे कर्तव्य' या उपक्रमाअंतर्गत समाजसेविका ज्योती ठाकरे आणी त्यांची महिला टिम सदैव मदतीसाठी तत्पर असतात यापुढेही सहकार्य करणार असे मत व्यक्त केले. जीवनावश्यक वस्तूंचा संच १एप्रिल रोजी मंगरुळपीर शहरातील गरीब कुटुंबांना व गरजूंना देण्यात आला. या लॉकडाऊन काळात कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी  प्रयत्नशील आहोत असे ज्योती ठाकरे यांनी सांगीतले. तसेच प्रत्येक गरजु व्यक्तीपर्यंत संच पोहोचवण्याची जबाबदारी माझ्या सहकारी महिला,बचत गटातील सहकारी महिला यांनी घेतली असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी समाजसेविका ज्योती ठाकरे,अश्वीनी भोयर,सविता इंगोले,ज्योती लांडगे,जेष्ठ मा.शिक्षक नारायण वर्‍हाडे गुरुजी,पोलिस पाटील दिलिप तेलंग,विकी श्रृगारे,विनोद कर्पे,नंदु शाहाकार,मा.मंडळ अधिकारी पुंडलिक तेलंग,बाळु शाहाकार,धम्मा मनवर आदी मंडळींचीही ऊपस्थीती होती.गरीबांना मदत करन्यासाठी महिलांनी पुढाकार घेत जिवनावश्यक वस्तुंचे गरीबांना वितरण केल्याने गावकर्‍यांनीही ठाकरे आणी त्यांच्या टिमचे तोंडभरुन कौतुक केले असुन या कठीण परीस्थीतीतल्या मदतीने गरींबांच्या जगन्याला काहीसा आधार देवु शकले यांचे समाधानही असल्याचे या महिलांच्या चेहर्‍यावर स्पष्ट जानवत होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment