तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

पालकमंत्री ना.धनंजय मुंडेंचे संकटसमयी गावपातळीवर नियोजन ; गाव,वस्ती तांड्यावर ना.धनंजय मुंडेंचे फोन करून विचारपूसपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
राज्याचे सामाजिक न्यायमंञी तथा बीड जिल्हयाचे पालकमंञी ना.धनंजय मुंडे जिल्हयात तळ ठोकुन आहेत.कोरोनाच संकट राज्यावर महाभयंकर रुप धारण करत आहे.ना.धनंजय मुंडे हे परळी येथील निवासस्थानीच राहुन जिल्हयातील घडमोडीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.दररोज जिल्हाधिकारी व पोलिस अधिकक्षांकडुन जिल्हयाचा आढावा घेत आहेत.जिल्हयात कोणीही उपाशी राहु नये यासाठी रेशन पुरवठा विभागाला योग्य सुचना देऊन रेशन पुरवठा सुरळीत केला आहे.रेशन पुरवठा विभागाकडुन गावपातळीवर योग्य वितरीत होतो का नाही यासाठी पुर्ण लक्ष ठेऊन आहेत गावखेड्यात वस्ती तंड्यात हे रेशन योग्य भावात आणी योग्य पध्दतीने वितरीत होतो कि नाही याची स्वतः काळजी घेत आहेत पोहनेर येथील सरपंच नितीन काकडे यांना फोन वरुन रेशन पुरवठा वितरित होतो आहे का अशी विचारणा केल्याच्या फोन काॕलने ना.धनंजय मुंडे यांची जनतेशी नाळ कशी घट्ट जोडली गेली आहे हे दिसुन येते आहे.

No comments:

Post a Comment