तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

रेशन दुकानदारांनी बीड जिल्हाधिकारी यांच्या सुचनांचे पालन करावे ; गैरवर्तन करणाऱ्या दुकानदार कडक कारवाई करावी- निळंकठ चाटेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जगभरासह देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासनस्तर विविध उपाय योजत आहे. याच पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांना बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून संबधीत गोरगरीब नागरिकांना यांच्या पर्यंत योग्यरित्या मोफत धान्य वाटप करावे, गैरवर्तन करणाऱ्या रेशन दुकानदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजयुवामोचे युवा नेते निळंकठ चाटे यांनी केले आहे. 
            कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावर नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आता वाढत चालली आहे. हे आकडे  चिंताजनक आहेत. रोजगारासाठी कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने गोरगरीब नागरिक, शेतमजुर, सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.  
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी रेशन दुकानदारांना खालील प्रमाणे सुचना दिलेल्या आहेत. या सुचनांचे कठोरपणे पालन करावे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. कोरोना व्हायरसमुळे उतपन्न झालेल्या परिस्थिती मध्ये नागरिकांना मदत व्हावी म्हणून केंद्र व राज्य सरकारने रेशन दुकानदारांच्या मार्फत मोफत धान्य वाटप वितरीत करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत आपल्या दर महिन्याला धान्य मिळते त्याच धान्य बरोबर आणखी धान्य सोबत मोफत मिळणार आहे. बीड जिल्ह्यात तीन प्रकारेचे कार्ड वापरण्यात येत आहे.  अंत्योदय प्रति कार्ड नियमितपणे 23 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ मिळतो. प्रत्येक कार्डच्या लाभार्थ्यांना पाच किलो अतिरिक्त तांदूळ मिळणार आहे. त्याच प्रमाणे प्राधान्य गटातील नागरिकांना प्रति 3 किलो गहू,  2 किलो तांदूळ मिळत असते आता प्रत्येक महिन्यासाठी पाच किलो तांदूळ अतिरिक्त मोफत मिळणार आहे. एपीएल शेतकरी कार्ड त्यांच्यासाठी नियमित 3 किलो गहू, तांदूळ 2 किलो मिळणार आहे. परंतु यांना अतिरिक्त मोफत धान्य मिळणार नाही. या सर्व गहू 2 रूपये किलो, तांदूळ 3 किलो मिळणार आहे. दर महिन्याचे नियमित धान्य व मोफत धान्य आपल्या जवळील रेशन दुकानदार कडून घेण्यात यावे. या योजने अंतर्गत गँसचे पण मोफत वाटप करण्यात येत आहे. उज्जवल गँस कार्ड धारक कुटुंबासाठी एप्रिल, मे, जुन या तीन महिन्याची एक सिलिंडरची किंमत आपल्या खात्यात जमा करण्यात येणार ही रक्कम गँस वितरकांना देऊन मोफत सिलेंडर आणावे. या योजनांचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील(रेशन) धान्य वितरण फक्त ई पास मशीनद्वारे करण्यात येणार  आहे.  कोणत्याही लेखी पावत्याच्या आधारे धान्य आता कोणालाही मिळणार नाही. कुटुंबातील ज्या व्यक्तींचा आधार क्रमांक पाॅस मशीनमध्ये वैधरित्या जमा केलेला आहे . अशा कोणत्याही एका व्यक्तीच्या हाताचे बोट वापरून आपले धान्य मिळवता येते. मशीनवर बोट लावल्यावर संबंधित शिधापत्रिका मधील सर्व लोकांची नावे मशीनवर दिसतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे शासनाने आता रेशन दुकानदाराच्या अंगठ्यानीच सर्वांना धान्य देण्याची व्यवस्था केली आहे. धान्य वितरण ई पास मशीन द्वारे होणार असून धान्य वाटप करताना  मशीन मधून निघणारी पावती प्रत्येक शिधापत्रिकाधारकाने मागून घेतली पाहिजे सदर पावतीवर किती धान्य वितरण झाले याची माहिती नोंद होत असून किती रक्कम द्यायची याचा उल्लेख असतो पावती मिळत नसल्यास  आपले धान्य  चोरले जात असल्याचा  अर्थ असून  त्याची तक्रार  करण्यात यावी. तसेच मशीनवर बोट लावल्यावर संबंधित शिधापत्रिका मधील सर्व लोकांची नावे मशीनवर दिसतात.  त्यावरून आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तीचे नाव चुकले आहे किंवा ज्यांचे नाव समाविष्ट नाही आधार नंबर दिसत नाही अशा सर्व व्यक्तींचे आधार कार्डची झेरॉक्स संबंधित रेशन दुकानदार यांच्याकडे द्यावी. आणि दुरुस्ती करून घ्यावी या महिन्यामध्ये पुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. दि.15 एप्रिल पर्यंत सर्व संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे शिधापत्रिका धारकांची आपल्या गावातील त्रुटी पुर्ण न झाल्यास, घरी जाऊन आधार कार्ड घेऊन दुरुस्ती करणे, या महिन्या नंतर आधार कार्डची नोंदणी झाली नाही किंवा त्रुटी दुरुस्ती झाली नाही तर अशा संबंधित रेशन दुकानदाराला देण्यात येणार नाही, त्यामुळे आपल्या धान्य मिळणार नाही. दर महिन्याला नियमित धान्य त्यासोबत अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कार्ड धारक प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहेत.  
              कोरोनाच्या संकटकाळी हातावर पोट असलेल्या व्यक्तीची फरफट होत आहे. अशा कुटुंबाना मदत व्हावी म्हणून शासनाच्या वतीने मदत दिली जाते. परंतु काही रेशन दुकानदार हे गोरगरीब नागरिकांना पर्यंत पोहोचती करतील का नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. संबधीत रेशन दुकानदार यांना दिवसभर दुकान सुरू ठेवावेत अशा सुचना देण्यात याव्यात.पात्र शिधापत्रिका धारंकांना धान्य मिळते का त्यांची खात्री संबधीत वाभागा मार्फत करावी, तसेच रेशन दुकानदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या सुचनांचे पालन करून वाटप करावे. गैरवर्तन करणाऱ्यावर कडक करावी करावी तसेच जागतिक महामारी च्या कोरोना संकटाला रेशनच्या माध्यमातून काळाबाजार करणाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजपायुमोचे युवा नेते निळंकठ चाटे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment