तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

स्वयम शिक्षण प्रयोगच्या महिलाकडून गरजू व गरीब कुटुंबाना भाजीपाला वाटप.
प्रतिनिधी (लातूर)

  लोदगा ता. औसा येथे स्वयम शिक्षण प्रयोगच्या माध्यमातून २०१९ पासून सखी अन्न सुरक्षा शेतीचे काम १०० अल्पभूधारक महिला सोबत सुरु आहे. गावपातळीवर संवाद सहाय्यक म्हणून सौ. राजश्री शरद भोईबार व तालुका पातळीवर ट्रेनर म्हणून सौ. कौशल्या शशिकांत मंदाडे काम पाहतात. या मध्ये शाश्वत शेती, अन्न सुरक्षा, महिला सक्षमीकरण, व्यवसाय उभारणी, भाजीपाला लागवड, चारा लागवड, अझोला व हायड्रोपोनिक, शासकीय योजना, गरजू व गरीब कुटुंबाना मिळवून देणे. यामधून अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांची आर्थिक बचत झाली पाहिजे व त्यांनी घरी लागणारे धान्य, कडधान्य, भाजीपाला शेतात विषमुक्त पद्धतीने घेऊन स्वत: खाल्ला पाहिजे व शिल्लक राहिला तर बाजारात विक्री केला पाहिजे तसेच महिलांची शेतकरी म्हणून ओळख निर्माण झाली पाहिजे, या धरतीवर गावात १०० अल्पभूधारक शेतकरी महिलांनी काम जोमात सुरु केले आहे.

  कोरोना व्हायरस चे महाभयानक संकट जगावर, देशावर, महाराष्ट्रात तसेच लातूर मध्ये पोहचले आहे. हा विषाणू संसर्ग आजार असल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना भीती वाटत आहे. कारण साथीच्या आजाराने पूर्वी माणसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यूमुखी पडत होती. तसेच मोठ्या शहरातून खेड्याकडे लोक परत येत आहेत त्याची जास्त भीती त्यांना पडली आहे. कारण हा विषाणू साथ आजार मोठ्या शहरात आले व तो त्यांच्या सोबत गावात येऊन कोरोना ग्रस्त गाव होईल या भीतीने/चिंतेने महिला ग्रस्त झाल्या आहेत.यांचा परिणाम ग्रामीण महिलांच्या दैनंदिन जीवनावर प्रत्यक्ष होऊ लागला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत असून संचारबंदी मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा गरजू व गरीब कुटुंबाना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी आणि या बाबत लोदगा या गावच्या संवाद सहाय्यक प्रत्येक घरा-घरात जाऊन माहिती सांगत आहेत व हात कसा धुवावा यांचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. तसेच विधवा, अपंग, परीतकता या कुटुंबाना भेट देत असताना हातावर पोट असलेल्या गरजू व गरीब कुटुंबाना काम मिळणे अशक्य झाले आहे. असे त्याच्या लक्षात आले तेंव्हा त्यानी स्वयम शिक्षण प्रयोगच्या औसा तालुक्याच्या ट्रेनर सौ. कौशल्य मंदाडे यांना संपर्क केला तेंव्हा त्यांनी एक कल्पना सुचवली जान्हवी सखी कृषी गटातील भाजीपाला उत्पादन करणाऱ्या सदस्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या गटाअंतर्गत गरजू व गरीब कुटुंबाना भाजीपाला वाटप केला तर कसे राहील असे सांगितले. तेंव्हा संवाद सहाय्यक यांनी जान्हवी सखी कृषी गटातील भाजीपाला उत्पादन करणाऱ्या सदस्यांना प्रत्यक्ष भेटून भाजीपाला वाटप आपण आपल्या गटांतर्गत करून आपत्तीच्या काळात एक सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करून दाखवू शकतो. त्यावेळेस त्यांना गटातील कस्तूरबाई भोईबार, सुवर्णा उजळंबे, कविता भारती, सुनंदा भोईबार, अहिल्या भोईबार, रुपाली भोईबार, चंद्रकला भोईबार, लीलावती डिग्रसे, सुमन डिग्रसे व स्वत: संवाद सहाय्यक अशा १० सदस्यांनी प्रतिसाद दर्शविला. त्यामध्ये टोमॅटो १०० किलो, गवार १०० किलो, बटाटे १०० किलो, शेवगा १०० किलो, ४०० किलो भाजीपाला एकत्र करून गावातील सरपंच श्री. गोपाळराव पाटील, ग्रामसेवक श्री. लोणीकर साहेब, तालुका ट्रेनर कौशल्या मंदाडे, संवाद सहाय्यक राजश्री भोईबार, जान्हवी सखी कृषी गटाच्या अध्यक्षा सुवर्णा उजळंबे, जान्हवी सखी कृषी गटाच्या सचिव कविता उजळंबे, यांच्या हस्ते दि. १२ एप्रिल २०२० रोजी विधवा, अपंग, परीतक्ता गरजू व गरीब अशा ५३ कुटुंबाना भाजीपाला वाटप करण्यात आला. त्यावेळेस सोशल डिस्टनसिंगचा व मास्क/रुमालचा वापर करण्यात आला होता. त्या वेळेस गरजू व गरीब ५३ कुटुंबांनी जान्हवी सखी कृषी गटातील सदस्याचे आभार एक एकट्याने जाता जाता मानले. त्या वेळेस संवाद सहाय्यक यांनी आणखीन एक स्वत: ऑफर जाहीर केली ती म्हणजे या ५३ गरजू व गरीब कुटुंबाना जो पर्यंत लॉक डाउन संपत नाही तो पर्यंत माझ्या पिठाच्या चक्की वरून दळण मोफत दळून दिले जाईल असे त्यांनी जाहीर केले. त्यावेळेस सरपंच साहेब, ग्रामसेवक साहेब, जान्हवी सखी कृषी गटाचे अध्यक्ष व सचिव यांनी त्यांचे आभार मानले.

No comments:

Post a comment