तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

पत्रकार बालाजी देशमुख मारहाण प्रकरणातील आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करा-नंदकिशोर तोष्णीवाल


सेनगांव/प्रतिनिधी
दि.25 हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील गुगळ पिंप्री येथील पत्रकार बालाजी देशमुख यांनी अवैध वाळु संदर्भात बातमी बातमी प्रकाशित केली होती.याचा राग मनात धरून सहा जणांनी त्याना मारहाण केली त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांनी हिंगोली पोलीस अधिक्षक यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.
पत्रकार बालाजी दशरथ देशमुख यांनी दि.24 एप्रिल रोजी जलयुक्त शिवार बंधा-यावर अवैधरित्या वाळुचा वापर होत असल्याबद्दल बातमी प्रकाशित केली होती.त्यामुळे याचा राग मनात धरून सहा जणांनी मिळुन पत्रकार देशमुख यांना मारहाण केली.देशमुख यांच्या तक्रारी वरून सहा जणावर गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये 141,147,146,143,188,323,504,506 भादवि प्रमाणे व दि.24 एप्रिल रोजी संचारबंदी असल्याने 144 चे उल्लंघन केल्या प्रकरणी गु.र.नं.85/2020 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment