तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

युवक नेते दिपक तांदळे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाची मदत


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंकडे केला धनादेश सुपूर्द

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) युवक नेते, संस्कार शाळेचे सचिव दिपक तांदळे यांनी आपल्या वाढदिवसावरील खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रूपयाची मदत दिली आहे. मदतीचा धनादेश पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दिपक तांदळे यांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
          दिपक तांदळे यांचा आज वाढदिवस. लॉककडाउनमध्ये ऑनलाईन क्लासेस घेणारी संस्कार शाळा ही पहिली मराठी शाळा, दिलसे फाउंडेशन किंवा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ही स्पर्धा असो अशा सर्वच सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले दीपक तांदळे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळुन तीच रक्कम कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाची मदत केली आहे. एक लाखाचा धनादेश आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी नाथ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शंकर कापसे, युवा नेते महादेव शिंदे, महाराष्ट्र फार्मसिटी असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे आदी उपस्थित होते.
        दुपारी दिपक तांदळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक, नागरीकांना 500 सॅनिटाइझर आणि तेवढेच मास्कचे मोफत वितरण करण्यात आले. संस्कार शाळेच्या माध्यमातून दिपक तांदळे नेहमी नवनवीन उपक्रम करून सांस्कृतिक चळवळीत योगदान देतात. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सामाजिक भावना जोपासली आहे. वाढदिवसावर लोक अनावश्यक खर्च करून उधळपट्टी करतात मात्र तांदळे यांनी कोरोनाच्या लढाईत योगदान दिले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a comment