तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

कन्हेरवाडी लघु प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडा - माणिकभाऊ फड यांचे परळी तहसीलदारांना निवेदन


परळी वैजनाथ (दि.१२)  :- परळी तालुक्यातील कण्हेरवाडी लघु प्रकल्पातील पाणीसाठा ६५% शिल्लक असून हा तलाव अत्यंत डोंगराळ भागात असल्यामुळे टँकरने पाणी आणणे शक्य नाही. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिक भाऊ फड यांनी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

परळी तालुक्यातील कण्हेरवाडी लघु प्रकल्प अतिशय डोंगराळ भागात असून तेथे टँकर ने-आण करणे शक्य नाही. त्यामुळे टंचाईच्या काळात नदी पात्रात पाणी सोडण्यात येते. 

कण्हेरवाडी व परिसरातील लोकांना व जनावरांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासू नये याकरिता नदी पात्रात पाणी सोडण्यात यावे यासाठी माणिकभाऊ फड यांनी ग्रामपंचायतीकडे ठराव मांडला होता व तो ठराव एकमताने संमत झाला होता.

त्यानुसार कण्हेरवाडी सह जिरेवाडी, ब्रम्हवाडी, बँक कॉलनी, समतानगर, जलालपूर, शंकर पार्वती नगर, प्रियानगर, बजरंग नगर, व इतर  भागातील पिण्याच्या पाण्याची अडचण दूर व्हावी यासाठी कन्हेरवाडी लघु प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडणे गरजेचे असल्याचे माणिक भाऊ फड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a comment