तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

सेनगांव येथील तोष्णीवाल काॅलेजचे प्रा.डाॅ. शंकर पजई यांचे विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन


(विश्वनाथ देशमुख सेनगांवकर)


 सेनगांव/प्रतिनिधी:-  सध्या कोरोना विषाणुचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लाॅकडाऊन केले असुन विद्यार्थी घरीच आहेत त्यामुळे सेनगांव येथील तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे  प्राध्यापक डाॅ. शंकर पजई यांनी दि.22 एप्रिल बुधवार रोजी बि.ए.तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे बि.ए.तृतीय वर्षातील विद्यार्थ्यां सोबत झुम अॅप व्दारे ऑनलाईन संवाद साधला.HlN 260/BAC 421 या पाठ्यक्रमातील "हिंदी साहीत्य का स्वर्णकाल" या विषयावर त्यांचे ऑनलाईन मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमात महाराष्ट्रातील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये हिंदी साहीत्यामध्ये सन 1400 ते 1550 या काळाला स्वर्णकाल म्हटले गेले हा काळ राजनितिक दृष्टीने अस्थीर काळ होता तर सामाजिक दृष्टीने बघीतले तर धर्मसत्ता व राजसत्ता एकप्रकारे समाजावर अत्याचार करीत होती.हिंदु,मुस्लिम,बौद्ध व जैन धर्म हे शैव शाक्त,स्मार्त,गणपत्य,मंत्रयान,वजयान,सहजयान,कालचक्रयान,शरा,बसेरा,शिस्ती,कादीरी,सृहरावर्दी,सत्तारी अशा वेगवेगळ्या सांप्रादायात गुंतलेले होते.अशा प्रसंगी संत कबिर,तुळशिदास,सुरदास,मिरा,नामदेव,ज्ञानेश्वर या संतांनी समाज सुधारण्यासाठी सगुण,निर्गुण सांप्रादायाच्या माध्यमातून जातियता निर्मूलन ब्रम्हाडंबर चा विरोध अशी ठोस मते प्रगट केली.सदरील ऑनलाईन मार्गदर्शन बि. ए.तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत केले होते.याचा लाभ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी अॅनराॅईड मोबाईल व्दारे घरीच बसुन घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्रीपाद तळणीकर,विठ्ठल वलेकर,भगवान खणपटे,डाॅ.निखिलेश बजाज,डाॅ. राजाभाऊ नवगणकर,प्रा.संदीप मरकड,प्रा.त्र्यंबक केंद्रे,प्रा.संजय फड यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a comment