तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

गोरेगाव पोलिसांची सवना तांडा येथे हातभट्टी वर धाड

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


हातभट्टी धारकांचा कर्दनकाळ पोलीस निरीक्षक श्रीमनवार

कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सर्वत्र शहरातील दारूची दुकाने बंद असल्याने ग्रामीण भागातील हातभट्टी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून हातभट्टी विक्रेत्यां ची चांगलीच चांदी होताना दिसत आहे त्यात रविवार ता,19 ला सायंकाळी सहाच्या सुमारास गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सवना तांडा येथे हातभट्टी दारू उध्वस्त केली असून यात हातभट्टी रसायन 680 लिटर 50 रुपये लिटर याप्रमाणे एकूण 34 हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले ही आतापर्यंतची हातभट्टी वरील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे

 याप्रकरणी सुधाकर राठोड, अंबादास आडे ,चरणदास आडे ,विठ्ठल राठोड, बालाजी जाधव, प्रकाश जाधव ,उल्हास चव्हाण ,यांच्या वर पो कॉ साहेबराव राठोड यांच्या फिर्यादीवरून यांच्यावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली काशिनाथ शिंदे,विजय कालवे,कदम ,विजय महाले,यांच्या पथकाने हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त केले तेजः न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment