तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

जागृती प्रतिष्ठानच्या वतीने संकटकाळी गरीबांना मदत
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- दि.11  कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर हातावर पोट असणार्‍या गोरगरीब नागरीकांना जागृती प्रतिष्ठानच्या वतीने रेशन व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणुने जगभर थैमान घातले असुन या पाश्वभुमीवर आपल्याकडे या विषाणुला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे सर्वांचेच आर्थिक नुकसान होत आहे. मात्र हातावर पोट असणार्‍यांचे प्रचंड हाल होत आहे. परळीतील रोजंदारी, कष्टकरी, कामगार व गोरगरीब नागरीकांना नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जागृती प्रतिष्ठानने कोरोनाच्या संकटातही मदतीचा हात पुढे केला आहे. जागृती प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील हातावर पोट असणार्‍या गोरगरीबांना मदत करण्याचे निश्चित करण्यात आले असुन यात 5 किलो गहु, 5 किलो तांदुळ, 1 किलो साखर, 1 किलो तुरदाळ, 1 किलोचा मिठ पुडा, 100 ग्रॅम चहा पावडर आदी वस्तु वाटप करण्यात आल्या. आज जागृती पतसंस्था कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सिंग पाळुन जागृती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.गंगाधर शेळके सर, उपाध्यक्षा सौ.शोभाताई शेळके, संचालक बालासाहेब जगताप, दत्तात्रय शेळके, सुभाष नानेगर, लक्ष्मण चव्हाण, वसंत सुर्यवंशी,  दै.वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड, जागृती प्रतिष्ठानचे सचिव प्रल्हाद सावंत, सहसचिव गोविंद भरबडे, जागृती प्रतिष्ठानचे सदस्य हेमंत कुलकर्णी, प्रा.शशिकांत जोशी सर व जागृती ग्रुपचे कर्मचारी आदी मान्यवरांच्या हस्ते  गरजु, गरीब महिला व नागरीकांना  रेशन व किराणा सामानाचे वाटप  करण्यात आले. या उपक्रमास जागृती पतसंस्था व मल्टीस्टेटचे सर्व सभासद, ठेविदार व हितचिंतकांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment