तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

सईदखान यांच्या कडून पाच हजार गरजूंना होणार जिवनावश्यक वस्तूंचे वाटप;तहसिलदार,पोलीस निरिक्षकांच्या हस्ते मदतीचा शुभारंभ.

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-परिवर्तन विचार मंचचे अध्यक्ष सईदखान उर्फ गब्बर यांच्या मार्फत पाच हजार गरजू कुटूंबांना जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात येणार असून आज गुरूवार १६ एप्रिल रोजी सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करत तहसिलदार यु एन कांगने,पोलिस निरिक्षक बोधगिरे यांच्या हस्ते  सईदखान यांच्या निवासस्थानी गरजूंना जिवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप सुरू केले असून ही मदत नाव नोंदनी केलेल्या शहरातील आणि ग्रामिण भागातील गरजूंना घरपोच दिली जाणार असल्याची माहिती सईदखान यांनी दिली.

जगभरत थैमान घातलेल्या कोरोना विषाणू ने संपुर्ण जगाला थांबवले आहे. लॉक डाऊन असल्याने हातावर पोट असना-यांचे मोठे हाल सुरू आहेत. अशा परिस्थितीत जामाजिक जाणिव असलेली मंडळी आता मदती साठी पुढे येतांना दिसत आहे.पाथरी शहरातील उद्योजक तथा परिवर्तन विचार मंच चे अध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर यांना पाथरी शहरा सह ग्रामिण भागात पाच हजार गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निश्चय केला असून यात पाथरी,सोनपेठ,सेलू,मानवत तालुक्यातील ग्रामिण भागातील गरजूंना ही मदत घरपोच देणार असल्याचे सांगून हीच वेळ आहे संकट काळी समाजाच्या उपयोगी पडण्याची प्रत्येकाने आपआपल्या परीने या संकट काळात योगदान द्यावे असे ही ते या वेळी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले. या वेळी सईद खान यांच्या सह तहसिलदार यु एन कांगने, पोलिस निरिक्षक बोधगिरे, यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात जिवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप करण्यात आले. या नंतर गरजूंना त्यांच्या घरपोच मदत नेऊन देणार असल्याचे सईदखान यांनी या वेळी सांगितले.

No comments:

Post a comment