तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

निर्जतुकीकरण करून पाथरी शहर आणि ग्रामिण भागात होतेल गॅस सिलेंडरचे वाटप.किरण घुंबरे पाटील

पाथरी:-पाथरी तालुक्यातील ग्रामिण व शहरी भागातील ग्राहकांना घरगुती सिलेंडरचे घरपोच वाटप निर्जतुकीकरण करून करण्यात येत आहे. या कामी साई इंडेन पाथरी चा ऑफिस स्टाफ व डिलिव्हरी बॉय सकाळी सात वाजल्या पासून काम करत असल्याची माहिती साई इंडेनचे मालक व्हि डि पुजारी यांनी तेजन्यूजहेडलाईन्स शी फोन वरुन बोलतांना दिली.

जगभरात दहशत पसरवलेल्या कोरोना विषाणू मुळे देशात आणि राज्यात लॉक डाऊन आहे. अशा स्थितीत नागरीकांना सुरक्षे साठी घरा बाहेर पडता येत नाही. गॅस हे अत्यावश्यक सेवेत येते नोंदनी केलेल्या ग्राहकांना शहरातील साई इंडेन कडून ग्रामिण आणि शहरात सकाळी सात वाजल्या पासून सिलेंडर घरपोच देण्यात येत आहेत. या वेळी देण्यात येणारे सिलेंडर हे ज्या वेळी कंपनी कडून गॅस गोडाऊन ला उतरउन घेण्या पुर्वी सर्व सिलेंडर वर सोडीयम हायपोक्लोराईड ची फवारणी करून ते गोडाऊन ला उतरऊन घेतले जात आहेत. तर हे सिलेंडर ज्या वेळी ग्राहकांना देण्या साठी अॅटोतुन नेले जात असतांना पुन्हा निर्जंतुकीकरणा साठी पुन्हा सोडीयम हायपोक्लोराईड द्रावनाची फवारणी दर दिवशी करण्यात येत आहे. या सोबतच उज्वला गॅस धारकांना ही सिलेंडरचे वाटप करण्यात येत आहे. या ग्राहकांना एजन्सी कडून गॅस मोफत मिळावा म्हणून केंद्र शासनाने उज्वला लाभधारकांना गॅस ला लागनारे मानधन या लाभधारकांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती या वेळी पुजारी यांनी दिली. बँकेतून पैसे घेत या योजनेच्या ग्राहकांनी गॅस सिलेंडर खरेदी करावयाचा असल्याचे ते म्हणाले. साई इण्डेन कडे उज्वला चे ४४४३ कनेक्शन असून या पैकी ३९५४ ग्राहकांच्या खात्यात १३ एप्रिल पर्यंत पैसे जमा झाले आहेत ४ ते १२ एप्रिल पर्यंत उज्वलाच्या १४७९ ग्राहकांना गॅस सिलेंडर दिले गेल्याची माहिती पुजारी यांनी दिली. गॅस सिलिंडर वाटप करणा-या अॅटो ला जनजागृती करणारे बॅनर लटवण्यात आले आहे.शिवाय जनजागृती साठी पाचहजार हॅन्डपेपर ही तयार करून ते ग्राहकांना दिले जात आहे. त्या मुळे प्रत्येकाने काय काळजी घ्यावी हे या पॉम्पलेट मध्ये दिले आहे. गॅस सिलेंडर डिलेव्हरी देणा-या कामगारांना मास्क,सॅनेटायझर चे वाटप ही करण्यात आले असल्याची माहिती व्हि डी पुजारी यांनी दिली.

No comments:

Post a comment