तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

कोरोनाच्या लढाईत गंगाखेड चेक पोस्टवर शिक्षक वैजनाथ तांबडे देता आहेत योगदान


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गमुळे चिंताग्रस्त आहेत. संपूर्ण देशात लाँकडाऊन व संचारबंदी आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परळी-गंगाखेड या राज्य महामार्गावर चेक पोस्ट तयार केले आहे. परळीतील सर्वपरिचय असणारे शिक्षक वैजनाथ तांबडे हे कोरोनाच्या लढाईत योगदान देऊन आपली भूमिका प्रामाणिकपणे व जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
             देशासह संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या महाभयंकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स,पोलीस व सफाई कामगार दिवस-रात्र मेहनत घेत असताना तालुक्यातील शिक्षकही यामध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत. अशा जागतिक महामारी मध्ये आम्ही जनतेसाठी रस्त्यावर आहोत, जनतेने मात्र स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन कर्मचारी करताना दिसत आहेत.कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यात  गंगाखेड रोडवर या ठिकाणी विशेष चेक पोस्टची व्यवस्था मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उपविभागीय अधिकारी महाडिक यांच्या
गटशिक्षणाधिकारी यांनी केलेली असून यात शिक्षकही महत्त्वाचे योगदान देताना दिसत आहेत. जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन  करणार्‍यावर कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिमतीला या राष्ट्रीय कार्यात शिक्षकही योगदान देत आहेत. परळी-गंगाखेड येथील चेक पोस्टवर शिक्षक वैजनाथ तांबडे यांच्यासह महसूल, पोलिस कर्मचारी आपले कार्य करीत आहेत. शिक्षक वैजनाथ तांबडे सह आदी शिक्षक कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी,सफाई कामगार यांच्यासह शिक्षकांचेही सर्वस्तरातून कौतुक होत असून ज्याप्रमाणे आरोग्य व पोलिस कर्मचारी यांना ५० लाखाचा विमा शासनाने लागू केला आहे त्याचप्रमाणे पत्रकार आणि शिक्षकांनाही तो लागू करण्याची मागणी अनेक संघटना करीत आहेत. या लॉक डाऊन कालावधीत जनतेनी प्रशासनाला सहकार्य करतानाच नागरिकांनी  स्वतःची काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. 
      कोरोना विषाणूच्या महाभयंकर संकटात शिक्षक, महसूल पोलीस सर्व शिक्षक कर्मचारी तसेच शिक्षक वैजनाथ तांबडे यांचे कार्य दिवस-रात्र करत असलेले काम अतिशय कौतुकास्पद असून परळी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत ३० एप्रिल पर्यंत घरी राहुन पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. शिक्षक वैजनाथ तांबडे यांनी कोरोना या जीवघेण्या संकटात ज्याप्रमाणे डॉक्टर,पोलिस यांची भुमिका महत्वाची आहे त्याचप्रमाणे  संकटाचा सामन्यात त्यांची कामगिरी आणि संवेदनशील भुमीका व उत्कृष्ट कामगिरी महत्त्वाची आहे. तांबडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a comment