तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या निषेध आंदोलनाला यश वृत्तपत्र घरोघरी वितरणाला परवानगी


हिंगोली प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचे दि.१८/०४/२०२० च्या आदेशानुसार वृत्तपत्रांना घरोघरी वितरणावर निर्बंध घालण्यात आले होते.त्या विरोधात अ.भा.ग्रामीण पत्रकार संघा सह राज्यातील इतर पत्रकार संघटनानी तिव्र विरोध केला होता. अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाने तर मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन हा आदेश त्वरीत मागे घेण्याची मागणी करून २०एप्रिल रोजी संघटनेच्या सदस्यांनी व वितरकांनी काळी फित लावून सरकारच्या तुघलकी निर्णयाचा निषेध केला होता.याची दखल घेऊन राज्य शासनाच्या सबंधीत विभागाने २१ एप्रिल रोजी काढलेल्या सुधारित आदेशानुसार मुंबई,पुणे वगळता इतरत्र कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागु केलेल्या नियम व अटीचे पालन करून वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यास परवानगी दिली आहे.या सुधारीत आदेशामुळे आता ग्रामीण भागातील बेरोजगार मुलांना रोजगार मिळणार आहे.अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या पाठपुरावा व आंदोलनाला यामुळे बळ आले असून संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी केलेल्या परीश्रमा बद्दल संघटनेने सर्व सभासदांचे अभिनंदन केले असून महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे.धन्यवाद,उध्दवजी,धन्यवाद महाराष्ट्र शासन!,धन्यवाद,विरोधी पक्षनेते!आजी,माजी मंत्री गण!धन्यवाद ,विदर्भ डेली न्युज पेपर असोशिएशन नागपूर*
*-मनाेहर सुने राष्ट्रीय (अध्यक्ष)  सुरेश सवळे राष्ट्रीय (महासचिव) कैलास बाप्पू देशमुख (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष)
सागर सवळे प्रसिध्दीप्रमुख
अखिल भारतीय  ग्रामिण पत्रकार संघ (महाराष्ट्र प्रदेश)तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment