तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 7 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य नगरसेवक किरण लांडगे यांचे अनेक समाजोपयोगी कामे लॉक डाऊन मध्ये नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन

बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाच्या या थैमानामुळे आजवर अनेक देश संकटात सापडले आहे. मुंबईत देखील कोरोना व्हायरसचा रोजच्या रोज आकडा वाढताना दिसत आहे. कोरोनाबाबत खबरदारी म्हणून केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे बरेच लोक अस्वस्थ झाले आहेत. दैनंदिन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर आता उपासमारीचं संकट आलं आहे अश्या लोकांसाठी आशेचा किरण असणारे  प्रभाग क्र.१६० चे शिवसेना युवा नगरसेवक श्री किरण भाऊ लांडगे धावून आले आहेत विभागातील गरीब गरजूंना रोज दुपारचे मोफत शिजवलेले अन्न वितरण करण्यात येत असून गरजूंनी शिवसेना शाखा क्र.१६० च्या पदाधिकारी व स्वयंसेवक ह्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगरसेवक किरण लांडगे यांनी केले आहे. 
श्री मयुर मानसिंग राठोड शाखाप्रमुख ९९६७४४७३३१
श्री जितू जगताप शाखाप्रमुख९८९२८२५९३८
श्री पांडू शेलार समाजसेवक ९८१९२६९१५५
श्री विनोद निषाद उपशाखा प्रमुख
९९६९७६९९५५
तसेच त्यांनी आपल्या विभागात सर्व ठिकाणी सॅनिटायजर फवारणी, धुर फवारणी देखील केली गेली आहे. तसेच घाटकोपर विभागातील राजावाडी रूग्णालयात देखील डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय, पोलीस कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना देखील मास्क तसेच प्लास्टिक हेल्मेट यांचे वाटप करण्यात आले. संपूर्ण विभागात मानवी कोरोना बनवुन ह्या राक्षस मार्फत स्वतःचा बचाव करण्यासाठी कुठल्या उपाययोजना करायला हव्यात या संदर्भात जनजागृती देखील करण्यात आली
अहोरात्र मुंबई मध्ये नागरिकांच्या सुरक्षा रक्षणासाठी जे पोलीस बांधव रस्त्यावर काम करत आहेत त्यांना देखील चहा व अल्पोहार यांची सोय त्यांनी केली 
तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना संशयित आणि कोरोनाग्रस्त रुग्णांना डॉक्टरांतर्फे वारंवार गरम पाणी पिण्यास सांगण्यात येत होते, परंतु पिण्याच्या गरम पाण्याची सोय नव्हती , त्यामुळे तात्काळ शिवसेना नगरसेवक श्री किरण भाऊ लांडगे यांच्या स्वखर्चातून पिण्याचे पाणी गरम करण्याची मशीन पुरवण्यात आली.
तसेच काही दिवसापूर्वी
जांभुळपाडा बस थांबा येथे निवारा शेड उभारण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहाररूपी मागणी करुनही बेस्ट प्रशासन त्याकड़े जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते.. 
बेस्ट प्रशासनाच्या या लालफितीच्या कारभाराला कंटाळून अखेर बेस्ट प्रवाशांच्या आग्रहास्तव स्वखर्चाने बस निवारा शेडचे बांधकाम करुण रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या शेकडो प्रवाशांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळवून त्यांना दिलासा दिला 
गटार दुरुस्ती, ड्रेनेज लाईन, लादीकरण,
तसेच सुंदरबाग येथील जुनी  जीर्ण झालेली ६ इंच व्यास असलेली पाईप लाईन चा शुभारंभ काही दिवसापूर्वी करण्यात आला असे अनेक समाज उपयोगी कामे त्यांनी आपल्या विभागात केली.

No comments:

Post a comment