तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

मेहकर पोलीस आणि नगरपालिकेची संयुक्त कारवाई


तीनशे वाहनांवर कारवाई, हजारो रुपयाचा दंड वसूल

मेहकर –

कोरोणा विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक वेळा समजावून सुद्धा कळत नसल्यामुळे अखेर मेहकर पोलिस   व  नगरपरिषद यांच्या संयुक्त कारवाईचा सामना नागरिकांना करावा  लागला. शहरांमधून विनाकारण  दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहन घेऊन फिरनाऱ्या चालकांना दोनशे रुपयांपासून पंधराशे रुपये पर्यंतचा दंड आकारून नागरिकांना त्यांच्या कर्तव्य प्रती जान करून देण्यात आली. वारंवार शासनाच्या वतीने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. देशात कोरोणा विषाणू गंभीर रूप घेत असून शेकडो बळी गेले आहेत तर हजारो लोक या कोरोना विषाणूमुळे ग्रासले आहेत.असे असतानासुद्धा नागरिकांनी आपली जबाबदारी पार न पाडता शासनाच्या नियमांना तिलांजली देण्याचे काम सतत सुरू आहे यामुळे त्रस्त होऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा प्रधानमंत्री यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने ठिक ठिकाणी कडक पावले उचलत आहे.देशात सुरू असलेली कोरोनाव्हायरस लढाई नागरिकांच्या सहकार्याशिवाय जिंकता येणार नाही तेव्हा नागरिकांनी आवश्यकता असल्यास सोशल डिस्टन्स इन चा नियम तसेच तोंडाला मास्क लावून घरा बाहेर पडता येईल. परंतु या दरम्यान नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी  यांनी दिली आहे. नगरपरिषद मेहकर च्या वतीने वेळोवेळी बदलणाऱ्या नियमांची माहिती नागरिकांना नगरपरिषदेच्या ध्वनी प्रक्षेपण वाहनांमधून देण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती मुख्याधिकारी गाडे यांनी दिली आहे. तरी सुद्धा नागरिक या कडे लक्ष देत नाही त्यामुळे नियम मोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment