तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

बोरगाव पंचायत समिती सर्कलमध्ये गोपाल पाटील राऊत यांच्यावतीने धान्यासह किराणा माल गरजवंतांना वाटपवाशिम(फुलचंद भगत)-देशात कोरोना या आजाराने थैमान घातलं असून लॉकडाऊन व संचारबंदी काळामध्ये गोरगरीब मजूर यांचे आतोनात हाल होत असताना मालेगाव तालुक्यातील बोरगाव पंचायत समिती सर्कलमध्ये गोपाल पाटील राऊत यांच्या वतीने गरजवंतांना धान्याचे व किराणामाल वाटप करण्यात आले त्यामध्ये 
      बोरगाव येथे दहा गरजवंतांना धान्य किराणा मालाचे कीट आणि पन्नास तोंडाला लावण्याचे मास्क 
बाजार समितीचे संचालक पंडितराव लांडकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आला तसेच
            पिंपळा येथे धान्यासह किराणा मालाचे कीट व मास्क पंचायत समिती सदस्य जगदेव ढंगारे व गावचे सरपंच गोपाल देवळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आला तसेच 
आमखेडा येथे गरजवंतांना धान्यासह किराणा मालाचे कीट व मास्क गावचे सरपंच विठ्ठल जोगदंड व कर्मचारी गजानन पाचरणे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच 
        हनवतखेडा येथे गरजवंत लाभार्थ्यांना धान्यासह किराणा मालाचे किट व मास्क सरपंच सुनील राऊत व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आला तसेच 
  जामखेड येथे धान्यासह किराणा मालाचे कीट व  मास्क माजी पंचायत समिती सदस्य गजानन लोखंडे व सरपंच दशरथ डोके यांच्या हस्ते करण्यात आला सदर 
           बोरगाव पंचायत समिती सर्कल मधील गावामध्ये प्रत्येक गरजवंत लाभार्थ्यांना पाच किलो गहू एक किलो बेसन एक किलो मीठ 500 ग्राम तेल आणि त्याला लागणारी हळद व चटणी आणि  मास्क अशा पद्धतीने वाटप करण्यात आला याप्रसंगी बोलताना गोपाल पाटील राऊत यांनी सांगितले की जनसेवा हीच ईश्वरसेवा असून या भावनेतून आम्ही गोरगरीब जनतेचे सेवा करत आहोत यामध्ये दोनशे गरजवंतांना यांच्या किट तयार करण्यात आल्या होत्या दोनशे गरजवंतांना वाटप करण्यात आले त्यामध्ये 1000 गरजवंतांना मास्क वाटप करण्यात आले आणि 200 गरजवंतांना डेटॉल साबण वाटप करण्यात आले व 200 हँडवॉश वाटप करण्यात आले अशाप्रकारे संचारबंदी व लॉकडाऊन  काळामध्ये ज्या गरजवंत यांचे हाल होत असतील अशांना मदत करण्यासाठी मी व माझा परिवार केव्हाही तयार आहे जेथे सेवा करण्याची संधी मिळेल तेथे करण्याचा प्रयत्न करू जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आम्ही एक छोटुसा खारीचा वाटा समजून भार उचलण्याचा प्रयत्न केला अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment