तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्रकडून परळीत अनेक उपक्रम ; चंदुलाल बियाणी यांचा पुढाकार; टीम करतेय अविरत काम


महादेव गित्ते | 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
राधा-मोहन साथी प्रतिष्ठान, स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्र यांच्या वतीने परळी शहरात अनेक उपक्रम लॉकडाऊनच्या काळात राबविण्यात येत आहेत. कोरोना ही जागतीक आपत्ती आहे. यामुळे संपूर्ण जग दहशतीखाली असून, भारतातील आणि महाराष्ट्र राज्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. संकटाच्या काळात अनेक छोट्या संकटांना नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. या काळात त्यांच्या मदतीला धावून जाणे अत्यंत आवश्यक आहे ही बाब लक्षात घेवून विविध उपक्रम परळी शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यापासून राबविण्यात येत आहेत. दै.मराठवाडा साथी जनजागृती अभियान अंतर्गत गरजू नागरीकांना अन्नधान्याचे वाटप, मास्क आणि हातातील ग्लोजचे वितरण, शुध्द आणि फिल्टर्ड पिण्याच्या पाण्याची मोफत सोय, अधिकारी, कर्मचारी आणि गरजवंतांना स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्रच्या वतीने जेवण डब्ब्यांचे वितरण, शहरातील जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था, शहराच्या विविध भागांत जंतुनाशक औषधांची फवारणी, हात धुण्यासाठी ६००० लिटरचे टँकर, दै.मराठवाडा साथीच्या दररोजच्या अंकातून जनजागृतीपर लेख, कविता, साहीत्य यांचे प्रकाशन करण्यात येत आहे. राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमासाठी संस्थेच्या वतीने दत्तात्रय काळे, अजय पुजारी, गोपी कांगणे, संजय देवधरे, संजय गुंडाळे, आनंद हाडबे, अनंत भाग्यवंत, वैजनाथ कासार, ओम काळे आदी परिश्रम घेत आहेत.


परळी शहरात औषध फवारणी

नागरिकांना स्वच्छता पाळा, घराबाहेर पडू नका असे आवाहनही करण्यात येत आहे. शासनाच्या मदतीला अनेक समाजसेवी संस्था वेगवेगळ्या पद्धतीने पुढे येत आहेत. दै.मराठवाडा साथी जनजागृती अभियान अंतर्गत परळी शहरांमध्ये राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्यावतीने विविध प्रभागात अवितरत औषध फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परळी शहरात दै.मराठवाडा साथी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. कोरोनासारख्या महामारीपासून दूर राहण्याचे आवाहन नागरीकांना याद्वारे केले जात असून, प्रत्यक्ष उपाययोजनाही केल्या जात आहेत. बुधवारी शहरातील विविध भागात असलेले छोटे छोटे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्यांना नाल्या व घरांचे कट्टे आदी ठिकाणी जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. ट्रॅक्टरवर बसवण्यात आलेल्या एक हजार लिटरच्या टाकीतून हे औषध फवारण्याचा उपक्रम चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. नागरीकांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण अशा गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. संपूर्ण शहरातील कोणत्याही भागांत आवश्यकतेनुसार छोट्या ट्रॅक्टरद्वारे फवारणी केली जात आहे.


7000 मेडीकेटेड मास्क व 1000 हॅण्डग्लोजचे वितरण

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने परळी शहरात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने जंतुनाशक औषध फवारणी, शुध्द, फिल्टर्ड व निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याने हात धुवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचबरोबर शहरातील नगर पालिका कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, वृत्तपत्र विभागात काम करणारे यांच्यासह नगरीकांना 7000 मेडीकेटेड मास्क व 1000 हॅण्डग्लोजचे वितरणही करण्यात आले आहे. कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी हे मास्क व हॅण्डग्लोज सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. प्रशासनाच्या विविध विभागांतील कर्मचारी नागरीकांच्या आरोग्यासाठी अविरत काम करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्याही आरोग्याची काळजी करणे ही आपली जबाबदारी आहे या भावनेतून मास्क व हॅण्डग्लोज वाटपाचा उपक्रम चंदुलाल बियाणी यांच्या वतीने राबविण्यात आला.


येथे हात धुवा, मगच पुढे जा!

लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्यापासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून राधा-मोहन साथी प्रतिष्ठानने "येथे हात धुवा, मगच पुढे जा" हा उपक्रम सुरू केला आहे. स्वच्छ आणि फिल्टर्ड पाणी आणि साबण नागरिकांना हात धुण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मोंढा, पोलीस स्टेशन, शहरातील विविध चौकात हे टँकर उभे केले जात असून, नागरिक तेथे हात धुवत आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याचा मुख्य स्रोत हा हात असल्याने वेळोवेळी हात धुवा असे सांगण्यात येत आहे. विविध कामाच्या निमित्ताने बाहेर निघालेल्या नागरिकांना शक्यतो हात धुण्याची सोय उपलब्ध नसते, ही बाब लक्षात घेऊन गेल्या आठवडाभरापासून राधा-मोहन साथी प्रतिष्ठानने हा उपक्रम चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी तोंडाला रूमाल किंवा मास्क लावणे, स्वच्छता राखणे वेळोवेळी हात धुणे असे उपाय सांगितले जात आहेत. परंतू कामानिमित्त बाहेर पडलेल्या व्यक्तींना सहसा बाहेर हात धुण्यासाठीची सोय उपलब्ध नसते.  ती सोय परळीत उपलब्ध व्हावी यासाठी दै.मराठवाडा साथी आणि राधामोहन साथी प्रतिष्ठाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. शुध्द आणि फिल्टर्ड म्हणजेच निर्जंतुकीकरण केलेले पाणी नागरीकांना हाथ धुण्यासाठी लॉकडाऊनच्या घोषणेपासून शहराच्या विविध मुख्य ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत 5००० हजार लिटरचे शुध्द आणि निर्जंतुकीकरण केलेले फिल्टर्ड पाणी नागरीकांना हात धुण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरातील पोलिस स्टेशन, शिवाजी चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर, बसस्टॅण्ड समोर, मोंढा अशा विविध गर्दीच्या ठिकाणी टँकर नेले जात असून, नागरीकांना केलेल्या आवाहनाप्रमाणे तेथे सर्वजण हात धुत आहेत. विद्यमान स्थितीत हा उपक्रम परळी शहर व संभाजीनगर पोलिस स्टेशनच्या समोर सुरू आहे. सर्व पोलिस कर्मचारी व याठिकाणून जात-येत असलेले नागरीक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.


रक्तदान शिबिर!

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवारी परळीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. राज्य शासनाने रक्ताचा तूटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान करा असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्वा.रा.ती.अंबाजोगाई आणि उपजिल्हा रूग्णालय, परळी वैजनाथ यांच्या सहकार्याने परळीत राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबीरात अनेकांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले. राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी परळीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामेश्वर लटपटे यांच्या निरिक्षणाखाली रक्तदान शिबीरास सुरूवात करण्यात आली. या रक्तदान शिबीरात परळी शहरातील डॉक्टर्स, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, महिला यांनी सहभाग नोंदवला. यापुढेही जेंव्हा जेंव्हा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याची आवश्यकता असेल तेंव्हा तेंव्हा प्रतिष्ठानकडुन शिबीराचे आयोजन केले जाईल असे आश्वासन प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिले.
निराधार निराश्रीतांना जेवण डब्बे!

कोरोना आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, चेकपोस्टवर असलेले शिक्षक व अनेक विभागांचे कर्मचारी तसेच गरजू आणि निराश्रीत लोकांना गुरूवारी दै.मराठवाडा साथी जनजागृती उपक्रमाच्या अंतर्गत राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र यांच्या वतीने तयार जेवण डब्बे व फिल्टर्ड पाण्याच्या बाटल्या पोहच करण्यात येत आहेत. आपण फक्त एक फोन करा आणि आपली गरज कळवा, आम्ही आपल्याला  तयार जेवण डब्बा पोहच करू असे आवाहन सतत करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या जेवणाची आभाळ होत आहे. ज्यामध्ये नागरीकांच्या सेवेत तत्पर असलेले विविध प्रशासकीय विभागांचे कर्मचारी तसेच मंदीर आणि रस्त्यांवर असलेले निराधार निराश्रीत लोकांच्या जेवणाच्या सोयीसाठी राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आणि स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र यांच्या वतीने तयार जेवणाचे डब्बे व फिल्टर्ड पाण्याच्या बाटल्या दररोज पोहच करण्यात येत आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली दै.मराठवाडा साथी जनजागृती मोहीमे अंतर्गत हा उपक्रम शहराच्या विविध भागांत राबविण्यात येतो आहे.


जनावरांसाठी चाऱ्याची सोय!

कोरोना आजारचा फैलाव लक्षात घेता लॉकडाऊनची केंद्र सरकारने घोषणा केली. हा अतिशय महत्वाचा आणि नागरीकांच्या काळजीच्या दृष्टीने आवश्यक असलेला निर्णय केंद्राने घेतला. अचानक आलेल्या आपत्तीमुळे नागरीकांत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. जशा माणसांच्या गरजा असतात तशा अन्नपाण्याच्या गरजा प्राण्यांच्याही असतात. माणसाच्या मदतीला अनेक संस्था, समाजसेवक, प्रशासन धावून येत होते. परंतू शहरात असलेल्या जनावरांकडे सुरूवातीच्या काळात कोणाचेही लक्ष सहसा गेले नाही. मराठवाडा साथी जनजागृती अभियान अंतर्गत राधा-मोहन साथी प्रतिष्ठानकडून दररोज जनावरांना हिरवा चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जनावरांसाठी लागणारा चारा शेतकऱ्यांकडून विकत घेवून संस्थेचे स्वयंसेवक जनावरे दिसतील तिथे नेऊन त्यांना भरवत आहेत. लॉकडाऊनच्या काळात हाही उपक्रम अविरतपणे राबविण्यात येतो आहे.


 मागतील त्यांना शुध्द पाणी पुरवठा

मराठवाडा साथी जनजागृती अभियान अंतर्गत हेल्पलाईद्वारे नागरीकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला जात आहे. याद्वारे नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा मागणीनुसार पुरवठा दररोज केला जात आहे. 6००० लिटरच्या टँकरद्वारे मराठवाडा साथी सुयोग अक्वाचे शुध्द आणि फिल्टर्ड पाणी नागरीकांना घरोघरी जावून दिले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातील स्वाती नगर, पंचशिल नगर, पॉवरलूम, स्नेहनगर, बाजीप्रभू नगर, हालगे गल्ली, हिंद नगर, गांधी मार्केट, हमालवाडी येथील नागरीकांना शुध्द आणि फिल्टर्ड पाण्याचे वितरण दारोदार जावून गेले जात आहे.


मराठवाडा साथीचे जनजागृती अभियान!

कोरोना आजारावर नागरीकांची जनजागृती व्हावी यासाठी विविध लेख, कविता आणि काळजीचे उपाय सांगणारे साहीत्य पोचवणे अत्यंत गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेता गेल्या महिनाभरापासून दै.मराठवाडा साथीच्या माध्यमातून विविध लेखकांचे लेख या सदराखाली छापून नागरीकांची जनजागृती केली जात आहे. याचा अतिशय सकारात्मक परिणाम लोकजीवनावर होत असल्याचे पहावयास मिळत असून, नागरीकांनी हे साहीत्य वाचून आपल्या जीवनशैलीत महत्वपूर्ण बदल करून घेतले आहेत. वाचकांच्या यावर हजारो प्रतिक्रीयाही येत आहेत. या साहीत्याचा खुप महत्वपूर्ण फायदा होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.


अन्नधान्य वाटप आणि त्यासाठी मदत

अचानक आलेल्या आपत्तीमुळे आणि लॉकडाऊनच्या घोषणेमुळे नागरीकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक गरजूंना राधा-मोहन साथी प्रतिष्ठानकडून १५ ते २० क्विंटल धान्य वितरीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर रेशनचे धान्य मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना कागपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते. परंतू कुठेही काहीही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेता नागरीकांना त्यांच्या रेशन कार्ड ऑनलाईन करून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढता याव्यात यासाठी दै.मराठवाडा साथी कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे शेकडोंचे रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागपत्रांच्या संचिका तयार करता येऊ शकल्या.

No comments:

Post a comment