तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

प्रत्येक लाभार्थ्यास धान्य मिळेल, काही तक्रार असेल तर संपर्क करा-शहरप्रमुख राजेश विभुते


स्वस्त धान्य वितरणावर शिवसैनिकांची करडी नजर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी वैजनाथ येथील
पुरवठा विभागातील वाढता गोंधळ आता मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाऊन पोहचला आहे. त्यामुळे कोणीही उपाशी झोपणार नाही, यासाठी प्रत्येक शिवसैनिकासह पदाधिकार्‍यांनी स्वस्त धान्य वितरणावर लक्ष ठेवावे अशा सूचना  शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना केल्या आहेत. त्यानुसार आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख राजेश विभुते हे दर दिवशी माहिती घेत आहेत. यापुढे तक्रारी असल्यास नागरिकांनी कळवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरप्रमुख राजेश विभुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की, पुरवठा विभागातून शहरातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत धान्य वितरित करावे यासाठी प्रत्येक शिवसैनिकासह पदाधिकार्‍यांनी लक्ष ठेवावे अशा सूचना पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यानुसार आता आमचा प्रत्येक शिवसैनिक, पदाधिकारी स्वस्त धान्य वितरणारवर लक्ष ठेऊन असणार आहे. कोणत्याही गोरगरिबास धान्य मिळत नसेल अथवा कमी दिल्यास शिवसैनिकांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन शहरप्रमुख राजेश विभुते यांनी केले आहे...
 ते पुढे म्हणाले की, शासन नियमानुसार पुरवठा विभागातील धान्य वितरण करताना लाभार्थी निश्चित करुन देण्यात आले आहेत. अंत्योदय योजनेत एका कुटूंबास एकूण 35 किलो धान्य मिळते. त्यात 23 किलो गहू, 12 किलो तांदूळ (शासन आदेशानुसार बदल होतो) दिला जातो.   अन्न योजनेत (प्राधान्य कुटूंब योजना) प्रति लाभार्थ्यास 5 किलो धान्य दिले जाते. त्यात 2 रुपये प्रतिकिलो दराने 3 किलो गहू तर 3 रुपये प्रतिकिलो दराने 2 किलो तांदूळ दिला जातो. असाच दर आणि धान्य ए.पी.एल. योजनेअंतर्गत देखील लाभार्थ्यास मिळतो.  त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकास स्वस्त धान्य मिळत नसेल, कमी दिले जात असेल  तर त्या स्वस्त धान्य दुकानाची तक्रार  स्थानिक  शिवसेना पदाधिकारी  किंवा  शिवसैनिकास कळवावे. अथवा थेट माझ्याशी. +919405481111 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन. शहरप्रमुख राजेश विभुते यांनी केले आहे.

No comments:

Post a comment