तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

अशी वर्तविल्या गेली मांडणीतील भाकिते.. ➡️ पृथ्वीवरचं संकट कायमच..


➡️ अर्थव्यवस्थाही कोलमडलेली राहील..
➡️ माणसांसह पिकांवरही रोगराईचे भाकीत..
➡️ राजा कायम; परिस्थितीमुळे राहिल राजावर ताण..
➡️ पाऊस चांगला; पण महापूर- अवकाळीचेही संकट..
➡️ संकटावर संघटितपणे मात करण्याची व्यक्त केली गरज..

#भेंडवळ_मांडणीची_परंपरा_राहिली_अखंड
प्रल्हाद महाराज वाघ व सारंगधर महाराज यांनी वर्तविले भाकीत

भेंडवळ ता. जळगाव जामोद:

अक्षय तृतीयेला केल्या जाणारी 368 वर्षापासूनची परंपरा भेंडवळ मध्ये लॉकडाऊनच्या काळातही वाघ कुटुंबीयांच्या अवघ्या दोन जणांनी कायम ठेवली. याठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून ही मांडणी पुढे ढकलल्याचे त्यांनी जरी जाहीर केले होतेतरी, अनेक शेतकऱ्यांच्या आग्रहावरून अखेर काल रविवार 26 एप्रिल रोजी सायंकाळी वाघ कुटुंबियातील दोघांनी त्यांच्या शेतात जाऊन परंपरेप्रमाणे मांडणी केली. या मांडणीचे भाकीत आज सोमवार 27 एप्रिल रोजी सूर्योदयापूर्वी या दोघांनी केले. विशेष म्हणजे त्यावेळी तेथे कुठलीही गर्दी नव्हती.

 दोघांनी सकाळी जाऊन बघितले त्यावेळी घटावरील #पुरी_पूर्णपणे_गायब असल्याने #पृथ्वीवरील_संकटकायमच राहणार असल्याचे भाकित वर्तवण्यात आले तर करंजी म्हणजेच #कानोला_हा_सुद्धा #गायब दिसल्याने #अर्थव्यवस्था_कोलमडली_राहणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला तर #भादली_नावाचे_धान्य_विखुरलेले दिसल्याने माणसावर व पिकांवरही या वर्षात #रोगराई_कायम_राहणार असल्याचे भाकित त्यांनी वर्तवले. कऱ्यात पाणी कायम असल्याने यासह पाऊस चांगला जरी असलातरी अवकाळी पावसाचे व महापुराचे भाकीत यात वर्तविण्यात आले आहे. संरक्षण व्यवस्थेवर अहि ताण राहू शकतो, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. तर पिकांची थोडीफार नासाडीचा अंदाजही बांधण्यात आला आहे.
मात्र आलेल्या संकटाचा संघटित होऊन सामना करत त्यावर मात करण्याची अपेक्षाही महाराजांनी या भाकितात व्यक्त केली असल्याने, सध्यातरी सर्वांनी लॉकडाऊन व त्यानंतर सरकारने ठरवून दिलेले नियम पाळण्याची खरोखर गरज असल्याचे या भाकीतातून शेवटी अंदाज आल्याने.. संकट जरी आले असलेतरी त्याचा मुकाबला मात्र सर्वांनी मिळून होऊ शकतो, हा दिलासा आला आहे

No comments:

Post a comment