तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 April 2020

उप सभापती रिखब पाटणी यांनी स्वखर्चातून लोणी खुर्द येथील गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य मास्क, सॅनिटायझर वाटप...


गरजु गरीब कुटुंबांना दिले जिवनोपयोगी वस्तुंची कीट गरीबांना दिला आधार

शांताराम मगर प्रतिनिधि वैजापुर 

अवघा महाराष्ट कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना माञ गोर गरीबांचे खुप हाल होत आहे. अशा गरजु गरजवंताना एक हात मदतीचा म्हणून वैजापुर तालुक्यातील लोणी खुर्द येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा माजी सरपंच रिखब पाटणी यांनी स्वखर्चातून लोणी खुर्द येथील गोर गरीब निराधार 150 कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करुन तसेच गावातील इतर कुटुंबांना मास्क, सॅनिटायझर बाॅटल देऊन माणूसकीची बांधीलकी जपली. त्याचप्रमाणे गावातील बँक कर्मचारी पोलिस स्टेशनचे कर्मचारी परिसरातील पत्रकारांना देखील त्यांनी मास्क,सॅनिटायझर चे वितरण करुन एक अनोखा उपक्रम राबविला.
पुढील काळात रिखब पाटणी यांच्याकडून तलवाडा चिकटगाव पाराळा येथील गरीब नागरिकांना धान्य व किराणा किट वाटप करण्यात येणार आहे 
पाटणी हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहत असून या कोरोना लॉक डाऊन दरम्यान हातावर कमावणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील गरजवंतांना धन्य व किराणा कीटचे वाटप घरोघरी जाऊन केले आहे. हे वाटप करताना त्यांनी गोर गरीबांना व जनतेला प्रशासनाच्या नियमाचे पालन करा,घरीच राहा सुरक्षित राहा,स्वच्छता राखा,गर्दिच्या ठिकानी जायचं नाही आता आपण एकमेकांना सहकार्य करुन कोरोनाला न घाबरता प्रशासनाच्या नियमाचे पालन करुन लढायचे आहे असे आव्हन करत होते. 
यावेळी बोलताना रिखब पाटणी म्हणाले मजुरांच्या, हाताला काम नाही तर संध्याकाळची चूल पेटणार नाही, या कारणांमुळे, मिळेल ते काम करणारे मजूरवर्ग,व काम करणाऱ्या खेड्यातील माय बहिणी पोटाच्या खंळगी भरण्याकरिता आपल्या भागात असतांना त्यांना फुला फुलांची पाकळी मदत करणे हि आपली संस्कृती आहे आसे रिखब पाटणी म्हणाले. 
यापूर्वीही लोणी खुर्द येथे सरपंच असतांना स्वतःच्या बोर व विहिरीचे पाणी वर्षभर गावा सह वाड्यावस्त्यार मोफत पुरवले होते.

No comments:

Post a comment