तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

बँक, दुकानांसमोर गर्दीच गर्दी पालम शहरातील स्थिती तोंडाला मास्क न लावता अनेकांचा वावर
अरुणा शर्मा


पालम :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करुन जिल्हा प्रवेश बंदी केली असतानाही पालम शहरातील नागरिक मात्र याला गांभीर्याने घेत नसल्याचे पहावयास मिळत आहे. शहरात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र रोज पहावयास मिळत आहे. काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित करुन संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून सकाळी सात ते अकरा या वेळात भाजीपाला, किराणा आदी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी प्रशासनाने मुभा दिली आहे. यासाठी घराबाहेर पडल्यानंतर बाजारातन कोणतीही वस्तु अथवा मालाची खरेदी करताना सोशल डिस्टन्स ठेवून व्यवहार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत; परंतु, पालम शहरात यासंदर्भातील सूचनांचे काटेकोर पालन करताना अनेक नागरिक दिसून येत नाहीत. यासंदर्भात पाहणी केली असता सोशल डिस्टन्सच्या नियमांचा परता बोजवारा उडाल्याची स्थिती पहावयास मिळाली. शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर पैसे काढण्यासाठी सकाळी ११ वाजता शेकडो महिला व पुरुष ग्राहकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. यावेळी उपस्थित नागरिक सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करीत नाही. विषेश म्हणजे काही किराणा दुकानांसमोरही अशीच गर्दी दिसून येत आहे. दुसरीकडे नागरिक सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. तोंडाला मास्क, रुमाल बांधणे, याबाबत कोणीही काळजी घेताना दिसून येत नाही. सकाळी व सायंकाळी हे चित्र शहरात पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालम शहरातील नागरिकांना आता सज्ज होणे अत्यंत आवश्यक आहे. परभणी शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. शेजारच्या बीड व लातूर जिल्ह्यांतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भविष्यातील धोके ओळखून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रशासकीय पातळीवरही या संदर्भात लागू करण्यात आलेल्याची आदेशाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्रिय राहणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोणातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतन होत आहे. नियमांची अंमलबजावणी कडक होण्याची गरज परभणी शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने 17 एप्रिल रोजी विशेष आदेश काढले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धुंकणाऱ्या व्यक्तीला १०० रुपये दंड तर सार्वजनिक स्थळी मास्कन वापरणाऱ्या व्यक्तीला १०० रुपये दंड, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला १०० रुपये दंड आणि दुकानदार किंवा अस्थापना मालकास 400 रुपये पहिल्यांदा दंड, अशी तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्यांदा या नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा या आदेशाद्वारे देण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शहरात नगर पंचयात ची आहे. त्यामुळे नगरपंचायत याबाबत कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a comment