तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

कारंजा येथील पञकार सुधिर देशपांडे यांना झालेल्या मारहाणीचा मंगरुळपीर पञकार संघाकडुन निषेध


दोषींवर योग्य कारवाईसाठी प्रशासनाला निवेदन

वाशिम(फुलचंद भगत)-जिल्ह्यातील कारंजा लाड येथील एका दैनिकाचे तालुका प्रतिनिधी व वरिष्ठ पञकार सुधिर देशपांडे हे दि.२१ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या शेतात शेतीचे साहित्य घेवुन जात असतांना कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या एका अधिकारी आणी दोन कर्मचारी मिळून रस्त्यात देशपांडे अडवुन जबर मारहाण केली आणी त्यांना गाडीमध्ये बसवुन पोलीस स्टेशनला आणले.सध्याच्या लाॅकडाऊनच्या परिस्थीतीत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणारे पञकार हे आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती आणी शासनाचे काम करत आहे तसेच लोकोपयोगी ऊपक्रमही राबवत अाहेत असे असतांना एका जबाबदार पञकाराला मारहान होणे ही दुर्देवी बाब म्हणावी लागेल त्यामुळे याप्रकरणी गंभीरतेने दखल घेवुन दोषींवर योग्य ती कायदेशिर कारवाई करावी या मागणीसाठी दि.२२ एप्रील रोजी मंगरुळपीर येथील तहसिलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना मंगरुळपीर पञकार संघाकडुन लेखी निवेदन सादर करन्यात आले.यावेळी तालुक्यातील इलेक्र्टानिक,प्रिंट,साप्ताहिकाच्या पञकारांची ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment