तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

तरुणांनी असे बाहेर पडू नका जसा की एखादा उत्सव सुरू आहे


महाराष्ट्र : सध्या संपूर्ण जगात कोरोना ने हाहाकार माजवला असून अनेक देश ह्यासमोर हतबल झाले आहेत अनेक महासत्ता देशांनी अक्षरशः हात टेकले अश्यात आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्यासाठी सरकार ला सहकार्य केले पाहिजे सरकारी यंत्रणा आपल्यासाठी अहोरात्र कार्य करीत आहेत त्यात डॉक्टर हे हॉस्पिटलमध्ये , पोलीस  रस्त्यावर तर अनेक सफाई कामगार तसेच मेडिकल चालक हे आपला जीव धोक्यात टाकून आपल्या संरक्षणासाठी उभे आहेत त्यात आपण ह्या सर्व यंत्रणाना सहकार्य करणे अपेक्षित आहे. परंतु सध्या अनेक ठिकाणी असे दिसून येतंय की नागरिकांना कुठल्याही प्रकारचे गांभीर्य दिसून येत नाहीत आपल्या रक्षणासाठी उभे असलेल्या पोलिसांवर डॉक्टरांवर हल्ले होत आहेत असे कोणते संकट नागरिकांवर येऊन पडले आहे की त्यांना घरात न बसता रस्त्यावर यावं लागतंय . कदाचित अनेक नागरिक म्हणतात की आम्हाला देशासाठी काही करायचे आहे तर मग आता घरात राहून देशासाठी सहकार्य करणे हे देखील आपले कर्तव्यच आहे. काही नागरिक फक्त बघायचे म्हणून बाहेर पडत आहेत अश्याने काय सिद्द करीत आहोत आपण हे अजूनही कळत नाहीय. 
       21 दिवसाच्या लॉकडाउन ने अपणा सर्वाना एक संधी मिळाली आहे की आपण सहकुटुंब एकत्र राहावे भविष्यात अशी वेळ येणार नाही सध्या शहरात असलेले सर्व कुटुंब आपल्या गावात आपल्या घरी आले आहेत आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवा. त्यात भविष्यातील योजना आखा ह्यात गावाकडची परिस्थिती अनुभवा आज सर्व लोक आपल्या गावी परतले ह्यात एक लक्षात असे आले की शहरात फक्त काम केले तर पैसे मिळवून आपण आपले कुटुंब चालवतो पण मला आज असे वाटते की "गाव हाच देशाचा पाया आहे पैसा नसला तरी गावात उपाशी राहणार नाही हा विश्वास लोकांना वाटतो म्हणून सर्व शहरातील मंडळी आज गावाकडे आली आहेत." तरुण मंडळी ह्याना नम्र विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र मधील सर्व सरकारी यंत्रणा ह्याना सहकार्य करून आपण घरातच थांबावे तसेच पालकांनीच घरातील पोलीस होणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांच्या साथीने आपल्याला ह्या संकटावर मात करायचे आहे. 

विकास मराठे 
ब्रँड अँबेसिडर , युथ इन्स्पिरेशन प्रोग्रॅम महाराष्ट्र राज्य , दिल्ली

No comments:

Post a comment