तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

जि प अध्यक्षा मनिषा पवार यांची शहिद जवान चंद्रकांत भाकरे कुटुंबाची सांत्वन परभेट १ महिण्याचे मानधन शहिद जवानाच्या पत्नीला आर्थिक सहाय्य जिल्हयाचे सुपुत्राचे बलीदान सदैव स्मरणात जि प अध्यक्षा पवार
संग्रामपुर [ प्रतिनिधी] देशसेवेसाठी डोळ्यात तेल टाकुन अहोरात्र तैनात असलेल्या सीआरसीएफ जवान चंद्रकांत भाकरे १८ एप्रिल रोजी दहशतवाद्याशी लढतांना शहिद झाले सदर वार्ता कळताच संपुर्ण जिल्हा शोक सागरात बुडाला कधी भरुण न निघणारे नुकसान झाले तर शहिद जवानचे बालगोपाल निरागस पाल्य अनाथ झाले शहिद जवानाचे कुटुंबांचे बलिदान सदैव स्मरणात राहिल व जवानाचे बलिदान जिल्हा विसारणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार यांनी पातुर्डा येथील शहिद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या कुटुंबीयांचे सात्वपर भेट प्रसंगी केले या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष पवार यांनी शहिद जवान चंद्रकांत भाकरे कुटुंबीयांची आस्थेने विचार पुस करुन कॉग्रेस पक्ष आपल्या पाठीशी असल्याची गव्हाई देत  
 जि प अध्यक्षांचे एका महिन्याचे मानधनाचा धनादेश शहिद जवानाची पत्नी मनिषा चंद्रकांत भाकरे यांना सुपुर्द यावेळी 
शहिद चंद्रकांत भाकरे यांचे वडिल भगवंतराव भाकरे पत्नी मनिषा भाकरे भाऊ जयंत ,तुषार आणि मुले व संपुर्ण भाकरे कुंटुंब यांचे  जि.प. अध्यक्षा मनिषाताई पवार यांनी सात्वण केले याप्रसंगी  काँग्रेस नेते रामविजय बुरूंगले, देवानंद पवार , माजी जिप अध्यक्ष भास्कर ठाकरे ,माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ ,तालुका अध्यक्ष राजेन्द्र वानखडे,जिल्हा काँग्रेस चिटणीस संजय ढगे, सरपंच शैलजाताई भोंगळ, उपसरपंच निलेश चांडक ,ज्ञानेश्वर वानखडे, अमीत पाटील, मंडळ अधिकारी उकर्डे  उपस्थीत  होते

No comments:

Post a comment