तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

आज जिल्ह्यात आनंदाची बातमी.. आ. नमिता मुंदडा यांना कन्यारत्न


सुभाष मुळे..
-----------------
बीड, दि. २४_ जिल्ह्याच्या  केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी आज एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुंबईच्या ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटे 5 वाजता त्यांची प्रसूती झाली. यानंतर ज्येष्ठनेते नंदकिशोर मुंदडा यांनी याबाबत फेसबुक पोस्ट टाकून मी आजोबा झाल्याची आनंदवार्ता मतदार संघाला दिली, एकंदरीत ही बातमी बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आहे.
     आमदार नमिता मुंदडा यांनी गर्भवती असतानाच्या काळात दररोज विधानसभा अधिवेशनात हजेरी लावली होती. शिवाय मतदार संघातही विविध कार्यक्रमांना त्या हजेरी लावत. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी लॉक डाऊनच्या काळात त्यांनी पती अक्षय मुंदडा यांची हेअर कटिंग केल्याचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले होते. बाळ आणि बाळाच्या आईची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. आमदार मुंदडा आता आई झाल्याने मतदार संघासोबतच त्यांना आता बाळाचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

No comments:

Post a comment