तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

पेठशिवणी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे थांबवलेले काम पुन्हा पूर्ववत सुरू करावेत पेठ शिवणी ग्रामपंचायतच्या सरपंचाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे मागणीआरूणा शर्मा
पालम :- कोरोना प्रतिबंध साठी करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत सुरू असलेले काम बंद करण्यात आले होते.सदर काम तात्काळ पुन्हा सुरु करुन पावसाळ्या आगोदर करण्यात यावी ,अशा प्रकारची मागणी पेठशिवणी ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामस्थांनी मा .कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.                 पालम तालुक्यातील पेठ शिवणी येथील बस स्थानक ते गावापर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू होते .संबंधित कंत्राटदाराने सदरील रस्त्याचे खडीकरणाचे एका स्तराचे काम केले आहे. तसेच नालीचे काम अर्धवट अवस्थेत केलेली आहे .दरम्यान, कोरोना आजाराच्या संकटामुळे शासनाकडून लॉक डाऊन करण्यात आले. त्यामुळे सदरील काम सुरू असलेले थांबविण्यात आले .या अगोदर करण्यात आलेले खडीकरणाचे काम रखडल्याने रस्त्यावर सर्वत्र खडी उखडलेली असुन यामुळे वाहन धारकांना वाहन चालवणे मुश्कील झालेली आहे .तसेच भविष्यात पावसाळाही जवळ आला असून पावसाळ्याच्या अगोदर रस्त्याचे खडीकरण ,मजबुतीकरण  डांबरीकरण व सिमेंटची  काम करण्यात यावेत जेणेकरून ग्रामीण जनतेला रस्त्याचा होणारा त्रास व अपघात टाळता येईल. लॉक डाऊन च्या काळात कामे सुरू करताना सोशल डिस्टन पाळून शासन निर्णयाच्या अटी शर्ती शेती आदेशाच्या धर्तीवर कंत्राटदारांना काम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत व त्यांच्याकडून काम करून घेण्यात यावेत ,अशा प्रकारची मागणी पेठ शिवनी ग्रामपंचायतचे सरपंच सौ सुरेखा अनंतराव करंजे यांच्यासह ग्रामस्थांनी मा.  कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालय परभणी यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment