तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

पोलिसांना चुकवण्यासाठी वडिलांच्या मृत्युची बतावणी

 सोनपेठ : तालुक्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने  सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की सद्यस्थितीत कोणीही घराबाहेर पडू नका ,घरी रहा - सुरक्षित रहा ,मास्क चा वापर करा, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे सांगण्यात येत असले तरी लोक काय करतील सांगता येत नाही, चक्क वडिलांचा काल रात्री मृत्यू झाला असल्याची खोटी बतावणी करण्याची घटना घडली आहे. सोनपेठ तालुक्यातील चेकपोस्टवर कार्यरत असणारे कर्मचारी व अंतर्गत कामकाज करणारी यंत्रणा सर्वांसाठी काम करत असताना वेगवेगळ्या युक्त्या लढवून लोक घराबाहेर पडत आहेत, त्यातच वडीलांचा रात्री मृत्यु झाला असल्याची बकावली करून चाकण येथून कार MH12 NX 2931 या कारमध्ये  आलेल्या 2 पुरुष व 1स्त्री यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून इन्स्टिट्युशनल क्वारनटाईन करण्यात आले आहे.
त्यांच्यावर cr no 122/20
कलम188,191,269,270,271,290 ipc ,51b अनवये गुन्हा नोंद केला आहे.
ही कार्यवाही पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी नंदकुमार कुळकर्णी, महेश कवठाले, आनंद कांबळे,अब्दुल रियाज यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment