तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

सई फाऊंडेशन च्या वतीने शेतकरी व शेतमजुरांना मास्कचे वाटप व जनजागृती


(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)


सेनगांव/प्रतिनिधी:-  संपुर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.कोरोनाचा प्रसार अती वेगाने वाढत आहे.तो थांबवीण्यासाठी शासनाकडून संपुर्ण देश लॉकडाऊन स्थितीमध्ये आहे.घरामध्ये राहुनच कोरोनाला हरवीण्याचे आवाहन करण्यात येत आहे.आशातच आपल्या आर्थव्यवस्थेचा मुख्यआधारस्तंभ,जगाचा पोशिंदा शेतकरी राजा यांना योग्य सामाजिक अंतर ठेऊन तसेच नियमाचे पालनकरून फक्त शेतीची कामे करण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन मधून सुट देण्यात आली आहे.सध्या बर्याच शेतकर्याच्या शेतामध्ये गहु कापणी,हळद काढणी,भुईमुंग,टाळकं,ज्वारी सारख्या पीकांचे विवीध कामे सुरू आहेत.या कामासाठी शेतीचा मुलभुत घटक आसणारा शेतमजूर वर्ग शेतकामामध्ये व्यस्त आहे.मोरगव्हाण परीसरातील आशा शकडो गहू कापणी करणार्या,हळद कढणार्या,हळद उकडनार्या शेतमजूरांना सई फाऊंडेशन मार्फत स्व खर्चाने मास्कचे वाटप करण्यात आले.त्याच सोबत परीसरातील शकडो शेतकर्यांच्या शेतवर जाऊन कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यात आली.शेत काम करतांना प्रत्येकांनी सामाजिक अंतर ठेवावे,प्रत्येक वेळी हात स्वच्छ धुवावेत.रोगप्रतीकार शक्ती वाढवीण्यासाठी सकस आहार घ्यावा,एकत्र येऊ नये,एकत्र बसू नये,किमान एक मिटर अंतर ठेऊंच इतरांशी संवाद साधावा,आफवा वर विश्वास ठेऊ नये,तसेच कोरोना संदर्भात अंधश्रध्दा बाळगु नये.आपल्या वस्तू इतरांना देऊ नयेत व आपण इतरांच्या वस्तू हाताळू नयेत.नियमीत मास्कचा वापर करावा आदी बाबींसह जनजागृती करण्यात आली.कोरोनाला कोणताही देव नाही तर आपणच हरवू शकतो या साठी प्रत्येकांनी सदैव जागृत राहण्याचे अवाहन सई फाऊंडेशनचे संस्थापक विलास कोकाटे यांनी केले.वाटप करण्यात येणारे मास्क फाउंडेशनचे मार्गदर्शक गजानन कोकाटे यांच्या पुढाकाराने व जयराम हगवने यांनी स्वतः शिवून सई फाऊंडेशनसाठी उपलब्ध करून दिले.

No comments:

Post a comment