तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अंबाजोगाई शिवसैनिकांनी दिले एकवीस हजार रुपये
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आली असून शहरी आणि ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लोकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले होते त्यानुसार अंबाजोगाई येथे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांच्या पुढाकारातून शिवसैनिकांनी एकवीस हजार रुपये दिले आहेत

करोना चा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर सर्वत्र लॉक डाऊन जाहीर झाला आहे यामुळे अनेक गोरगरीब मजुरांना आणि हातावर पोट असणाऱ्यांना दोन घास देता यावेत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करण्याचे आव्हान केले आहे यासाठी पुढाकार घेत अंबाजोगाई येथील माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन नगरसेवक शेख रहीम सचिन देवकर पंढरीनाथ साळवे अमोल पौळ यांच्या सह शिवसैनिकांनी एकवीस हजार रुपये धनादेश अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला आहे अशीच मदत दिली गेली तर गोरगरिबांना मोलाची होणार आहे.

No comments:

Post a comment