तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

गेवराई येथील बॅंक व्यवस्थापक विरुद्ध गुन्हा दाखल : गर्दी भोवली


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १६ _ कोरोना साथ रोग पसरण्याचा संभव असताना व लोकांच्या जिवितास धोकादायक असलेल्या  रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असताना बँकेत जमणाऱ्या गर्दीत सामाजिक अंतर  राहावे या करिता उपाययोजना केल्या नाही व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गेवराई शहरातील जुन्या बसस्टँण्ड परिसरात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक जगन्नाथ मदनराव सोनमाळी यांच्या विरुद्ध गेवराई पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक नारायण खटाणे यांच्या तक्रारीवरुन बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      कोरोना पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीत लाँकडाऊन सुरु असून जिल्हाधिकारी आणि शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे सर्व बँकेना कळविण्यात आले आहे. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत शेतकरी किंवा इतर खातेदार गेवराई येथील जुन्या बसस्टँण्ड परिसरात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जवळपास ५० पेक्षा जास्त खातेदारांनी बँकेत आणि बँकेच्या समोर गर्दी केली होती. कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळले नाही. दरम्यान बँकेच्या समोर पांढरे पट्टे किंवा खुनाही केलेल्या आढळून आल्या नाहीत. सध्या कोरोना रोग पसरवण्याचा संभव असताना व लोकांच्या जिवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असताना सदरील बँकेचे व्यवस्थापक जगन्नाथ सोनमाळी यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले होते.
        दरम्यान ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड, एस. आय सुनील ऐटवार, पोलीस नाईक नारायण खटाणे, संतोष गाडे यांनी केली. गेवराई शहरात अनेक बॅकेच्या समोर दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असुन अशा ठिकाणी देखील पोलिसांनी स्वत: लक्ष घालावे अशी मागणी गेवराई शहरातील नागरिकांनी केली असून सदरील गर्दीमुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गेवराई पोलिसांनी सर्व बॅंकांना तंबी द्यावी अशी देखील मागणी पुढे येत आहे.

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

No comments:

Post a comment