तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

तेजस्विनी काळे यांच्या पुढाकारातुन गरीबांना तांदुळ वाटप


गरीबांना मदतीचा हात देन्यासाठी महिलांचा पुढाकार

वाशिम(फुलचंद भगत)-सध्या देशात सर्वञ संचारबंदी असल्यामुळे गरीबांना जगणे मुश्कील झाले आहे,हातावरचे पोट असणारांची आबाळ होत असुन ऊपासणारही होत आहे.प्रशासन या लोकांना विविध माध्यमातुन सहकार्य करन्याचा आटोकाट प्रयत्नही करत आहे.अशाच गंभीर परिस्थीतीत समाजसेवेचा वसा घेतलेल्या काही सेवाभावी महिला पुढे येवुन मदतीचा हात देतांनाही दिसत आहेत.मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे यांच्या पुढाकारातुन महिलांनी एकञ येवुन गरजु व गरीबांना आपणाकडुन थोडा का होइना आधार म्हणून तांदुळाचे मोफत वाटप करन्यात आले.शासनाच्या सुचना आणी नियमांचे पालन करुन या महिलांनी गरजु लोकांच्या घरी जावुन त्यांना ही मदत केली आहे.तेजस्विनी काळे यांचे नेहमी सामाजीक योगदान असते तसेच त्या पर्यावरण जनजागृतीकरीताही पुढाकार घेत असतात.सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर समाजाप्रती आपलही काही देनं लागते या सेवाभावी दृष्टीकोनातुन सहकारी महिलांच्या मदतीने गरजुंना मदतीचा हात दिला आहे.यावेळी पार्वती गावंडे,ऊज्वला सदाशिव,सिमा घाळ,पार्वती लांभाडे,आशा पानभरे,लक्ष्मी टोंचर,विकी गावंडे,अन्नपुर्णा गायके,सुनंदा कावले आदींनी सहकार्य केले.आपापल्या परीने सर्वांनी या कठीण फरिस्थीतीत हातावरचे पोट असणारे गरजु गरीब,वृध्द,दिव्यांग,निराधार अशांना सहकार्य करावे असे आवाहनही सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे यांनी केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment