तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 April 2020

ग्रामीण भागातील २० लाख कुटुंब व १ कोटी जनते पर्यंत संगणकपरिचालक पोहचवणार
 आरोग्य सेतु एप्प !

          कोरोना विरोधातील मोहिमेत गावपातळीवर लढताहेत संगणक परिचालक !

मुंबई(प्रतिनिधी) :-  सध्या देशात व राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घालत असून,दिवसेदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत.त्याचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासन सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे.त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या माध्यमातून आरोग्य सेतु हे एप्प निर्माण करण्यात आलेले आहे.  या एप्पच्या साहय्याने नागरिकांना कोरोना बाबत सतर्क करण्यात येणार असून,हे एप्प महाराष्ट्राच्या  ग्रामीण भागातील गाव,वाडी,वस्ती,तांडा,पाडा या ठिकाणी राहणाऱ्या सुमारे २० लाख कुटुंब व त्यांच्या माध्यमातून १ कोटी जनते पर्यंत संगणकपरिचालक पोहचवत असल्याची माहिती संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.

      कोरोना विरोधातील मोहिमेत प्रशासनातील आरोग्य,पोलीस,ग्रामविकास,महसूल,उर्जा विभागासह अन्य विभागातील कर्मचारी योगदान देतच आहेत,त्यात गावपातळीवर आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेले संगणकपरिचालक सुद्धा गावात कोरोनाच्या मोहिमेत सक्रीय सहभागी असून,बाहेर गावावरून गावात आलेल्या नागरिकांच्या याद्या तयार करणे,जंतुनाशकाची फवारणी करणे,मोफत मास्क देणे,गरजूंना धान्य व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात ग्रामपंचायतीला मदत करणे,गावाच्या बाहेर गस्त घालणे,गावात जनजागृती करणे,नागरिकांना योग्य सूचना देणे,बाजाराचे नियोजन करणे,शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील उर्वरित धान्य वाटपास मदत करणे,रेशन वाटप करताना रेशन दुकानदार व जनतेला मदत करणे,यासह ग्रामपंचायतस्तरावर कोरोना विरोधात जे काम असेल त्यात संगणकपरिचालक सक्रीय सहभाग घेत आहेत.त्यातच केंद्र शासनाने कोरोना संदर्भात नागरिकांना अलर्ट करण्यासाठी आरोग्य सेतु हे एप्प तयार केलेले असून,ग्रामीण भागातील गाव,वाडी,वस्ती,तांडा,पाडा मध्ये राहणाऱ्या ६ कोटी जनतेच्या संपर्कात संगणकपरिचालक असून हे महत्वपूर्ण आरोग्य सेतु एप्प बाबत ग्रामीण जनतेला माहिती देऊन आपल्या मोबाईल मध्ये घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे.मागील १० दिवसापासून हे काम संगणकपरिचालकांच्या माध्यमातून राज्यात सुरु असून एक संगणकपरिचालक किमान १०० कुटुंबाना हे app देत आहे. म्हणजे राज्यातील २० लाख कुटुंबां पर्यंत हे एप्प पोहचेल त्याचबरोबर ज्या कुटुंबातील  व्यक्तीला हे एप्प दिले आहे त्याने दुसऱ्या ५ व्यक्तींना हे एप्प द्यायचे आहे म्हणजे आपोआप पहिल्या टप्प्यात १ कोटी नागरीका पर्यंत हे एप्प पोहचेल व कोरोनाच्या मोहिमेत नागरिकांना स्वतः सतर्क राहून दुसऱ्यांना सतर्क करता येईल.यासाठी संगणकपरिचालक प्रत्यक्ष तसेच सोशल मिडियावरिल whatsaap या माध्यमाचा वापर करून नागरिकांना या एप्प ची लिंक देत आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.  

आरोग्य सेतु एप्प  काय आहे?

१)देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी स्वतः या एप्प बाबत माहिती दिली असून प्रत्येक नागरिकाने हे एप्प आपल्या मोबाईल मध्ये घेण्याचे आवाहन केले आहे.

२)हे एप्प घेतल्यानंतर एक साधी चाचणी त्या एप्पवर द्यावी लागते,त्यात लक्षण आढळली तर त्याबाबतची  माहिती देणे गरजेचे आहे.

३)मोबाईल लोकेशन व ब्ल्यूटूथ नेहमी सुरु ठेवावे लागेल.

४)आपल्या आजू बाजूला एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण असेल तर ह्या एप्प मुळे आपण अलर्ट होणार पण त्याच्याकडे सुद्धा हे एप्प पाहिजे.

५)एखाद्या व्यक्तीला कोरोनाबाबत लक्षण आढळली आणि एप्प वर त्याबाबत माहिती दिली तर पुढे काय कारायचे डॉक्टरांना भेटायचे का घरीच क्वारंटाईन व्हायचे याबाबत माहिती मिळणार

६)जर तपासणी करायची असेल तर कुठे करायची यासह राज्य व केंद्र शासनाचे हेल्पलाईन क्रमांक देण्यात येणार

७)या आरोग्य सेतु एप्प वर कोरोना बाबतच्या सर्व live अपडेट मिळणार

No comments:

Post a comment