तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

पवित्र रमजानच्या प्रा.टी. पी. मुंडे यांच्याकडून शुभेच्छा घरात बसूनच नमाज पठणाचे केले आवाहनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांनी समस्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरात बसूनच नमाज पठण करावे असे आवाहन केले. धर्म परंपरेप्रमाणे मुस्लिम बांधव सार्वजनिक नमाज पठण करतात परंतु यावर्षी कोविड-19 चे मोठे संकट जगावर कोसळले आहे.

   संपूर्ण भारत देश लॉकडाऊन असून संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे सर्व धर्मीयांची मंदिर,मस्जिद व इतर प्रार्थना स्थळे बंद करण्यात आलेली आहेत त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ही संचारबंदी व जमावबंदीच्या नियमांचे पालन करून सार्वजनिक प्रार्थना स्थळावर गर्दी न करता 'रमजान'चा नमाज पठण घरीच करावा.


    केंद्र व व राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कोरोना विरोधाच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांनी केले आहे तसेच देशावरील व राज्यावरील कोरोना चे संकट निवारण्याची आपण सर्व मिळून अल्ला जवळ प्रार्थना करूया घरी बसून आपल्या कुटुंबीयांसोबत पवित्र रमजान साजरा करूया अशा शुभेच्छाही  त्यांनी दिल्या.

No comments:

Post a comment