तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

वर्क फ्रॉम होम अंतर्गत स्व. नितीन महाविद्यालय प्राध्यापकांचे ऑनलाईन ज्ञानदान
किरण घुंबरे पाटील
पाथरी:-कोरोना विषानुचा प्रादूर्भाव रोखण्या साठी संपूर्ण  देश लॉक डाऊन आहे. महाविद्यालय स्तरावरील सव॔ कम॔चारी यांना वक॔ फ्रॉम होम दिल आहे. याचा भाग म्हणुन स्व. नितीन कला व विज्ञान महाविद्यालय पाथरी  येथील प्राचार्य डॉ आर एस. फुन्ने यांच्या माग॔दश॔नाखाली कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रा. रंजित गायके,  प्रा. डॉ हरी काळे , प्रा डॉ गायकवाड हे विद्यार्थी सोबत ऑनलाईन संवाद साधत आहेत. या सोबतच पीपीटी,नोटस् आणि प्रश्नसंचऑनलाईन सादरीकरण इत्यादींच्या माध्यमातून आपआपल्या विषयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.तसेच लॉकडाऊनच्या कार्यकालात विद्यार्थ्यांचे मनेबल उंचावण्या साठीही प्राध्यापक मंडळी ऑनलाईन मार्गदर्शन करत आहेत.
   विद्यापीठ उन्हाळी परिक्षा जवळ आल्या मुळे सव॔ विषयाचा अभ्यासक्रमात समाप्त झाला आहे.  परंतु लॉक डाऊन मुळे सव॔ विद्यार्थी घरी बसुन अभ्यास करत आहेत. आशा विद्यार्थीना अभ्यासात काही अडचणी आल्यास त्या शंकाचे निरसन व्हट्सअप, स्काईप, फेसबुक लाईव्ह या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना काही ऑनलाईन शैक्षणिक वेब साईट, ऑनलाईन स्टडी मटेरीयल देण्यात येत आहे.

No comments:

Post a comment