तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

जैसे ज्याचे कर्म | तैसे फळ देतो रे ईश्वर ||


------------------------------------------
मानवी जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती आपआपल्या पद्धतीने कार्य करत असतो, त्या प्रत्येकाला आपण केलेल्या कार्याचे, प्रयत्नाचे फळ यश- अपयशाच्या स्वरुपात मिळत असते. या आजच्या अधुनिक माहिती व तंत्रज्ञान युगात अनेक लोक सोशियल मिडीया वापरत आहेत, सोशियल मीडियाच्या  माध्यमातून व्यक्त होताना आपण केलेल्या विविध संदेशाचे एकमेकांशी देवाण घेवाण (पोस्ट, मिम, व्हिडीओ, छायाचित्रे इ.) यांचा आपल्या जीवनात फायदा होतो, तसा तोटा सुद्धा होतो. हे प्रत्येक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. यामध्ये व्यक्त होताना सामाजिक जाणिवेचे भान ठेवले पाहीजे की शब्द है शस्त्र  आहेत व ते जपूनच वापरले पाहिजे. जर जपून वापरले नाहीत तर  काय काय घडत हे आपण 2014 पासुन बघतच आलो आहोत.अगदीच काल परवा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपण बघीतले आहे. 
सोशल मीडियाचा वापर तसा आपल्या भारतात 2013 पासुन जास्त प्रमाणात केला जाऊ लागला.सगळ्यात जास्त भारतात सोशियल मीडिया संदर्भातील साधने व अँपस वापरले जातात. जसा या सोशियल मिडीयाचा वापर राजकीय पक्षांनी सुरु केला.तसा यांचा वापर झपाट्याने वाढत गेला व यातून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आय. टी. सेल जन्माला आले. यातुन एक वेगळी राजकीय संस्कृती भारतात निर्माण झाली.या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्ष आपल्या निवडणुकीचा प्रचार प्रसार करत आहेत. आपली ध्येय धोरण लोकांना पर्यंत पोहचवतात. या राजकीय पक्षांनी केलेली काम लवकर व झपाट्याने सोशियल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचू लागली हे एक चांगल व विधायक काम या आय टी सेल (सोशल मीडिया)मार्फत होत असते पण या सोशियल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते आरोप प्रत्यारोप  करत असतात. आरोप प्रत्यारोपाची नैतीक पातळी ही काही राजकीय पक्षांच्या आयटी सेलने सोडून दिली. काही वापरकर्ते फेक अकाऊंट उघडुन काही लोकांच्या प्रतिमा मलीन करण्याच काम करताना दिसतात. काही घटनां विषयी संदशामध्ये वस्तुस्थिती सोडून खोडसाळ पणे छेडछाड करून समाजात दुफळी निर्माण करण्याच काम करताना दिसतात. यातुन एक नवीन प्रकार हा 2014 नंतर सोशल मीडियात निर्माण झाला तो म्हणजे ट्रेंड आणि ट्रोल, या प्रकारामुळे तर जनमानसाच्या जगण्यावर ऐवढा परिणाम केला की या प्रकारण काही लोकांचे आयुष्य उध्वस्त केले गेले, तर काहीना रोतो रात प्रकाश झोतात आणले. पण या ट्रोल प्रकारामधून व्यक्तीप्रतिमा जाणून बुजून खराब करण्याचे काम केले गेले. आपल्या राजकीय वैचारिक विरोधकला नैतीक पातळी सोडून बदनाम करण्याचा व त्याला माणसीक त्रास देण्याचे काम या ट्रोल्सने केले. हे मात्र दाहक वास्तव आहे . 
हे  ट्रोल करताना ठरवून केले जाते गट तयार करून हे काम केलेले दिसते, यामधे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली (JNU),  हैदराबाद विद्यापीठ व जामीया मिलीया विद्यापीठ , अलिगढ मुस्लिम विद्यापीठ व इतर शैक्षणिक संस्था असतील यांना ठरवुन बदनाम करण्याचा प्रोपोगंडा काही लोक  चालवताना दिसत असतात. यामध्ये रोहित वेमूला ,कन्हैया कुमार, शैला रशिद,आयषा घोष ,अशा अनेक विद्यार्थी नेत्यांची बदनामी करून त्यांना ट्रोल केले जाते व यामधे रोहित वेमुला सारख्या विद्यार्थ्यांला प्राण गमवावे लागतात
हेच काही सामाजिक ,आर्थिक, राजकीय , साहित्य, क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना जाणिवपुर्वक सुद्धा ट्रोल करून बदनाम केलेले दिसुन येते. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ट्रोल केले गेले, जेंव्हा राहुल गांधी जानेवारी महिन्यात सांगत होते की करोना जागतिक महामारी आहे, त्या संदर्भातील प्रतिबंधक उपाय योजना जानेवारी पासूनच सुरु कराव्यात, पण त्यांच्या या बोलण्याकडे गांभिर्याने न पहाता, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सद्धा त्यांची ट्वीटर वरून टिंगल उडवली होती आणि काही लोकांनी जाणिवपुर्वक त्यांना पप्पु म्हणून, तर तुम्ही इटलीला मामाच्या गावाकडे रहाण्यासाठी जा, आशा प्रकारे ट्रोल केले, तसेच अर्थतज्ञ व माजी रिझर्व्ह बँकेने गव्हर्नर रघुराम राजन यांना सुद्धा ट्रोल केले जाते, ते गेली 4 वर्षे झाल सांगत होते व आता लॉक डाऊनच्या काळात सुद्धा त्यांनी सांगितले की भारतीय अर्थव्यवस्थेत आर्थिक सुधारणा करणे गरजेच आहे, असे त्यांनी सुचवल की त्यांना ट्रोल करून बदनाम केले जाते. तसेच साहित्य क्षेत्रातील लेखक, कवी पत्रकार व जे पुरस्कार परत करत होते, त्या सर्वांना ट्रोल करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील नामवंत पत्रकार जसे रविश कुमार ,वाजपेयी , महाराष्ट्रात निखील वागळे, अशा अनेकांना जाणुन बुजून ठरवुन बदनाम केले जाते हे स्पष्ट दिसते. वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनातील कार्यकर्ते असतील यामध्ये हार्दिक पटेल, सारख्या युवकाला ट्रोल करून बदनाम करण्यात आले, आणि धार्मिक बाबतीत सुद्धा धार्मिक ट्रोल घडवुन दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वातावरण बनवल जात यामध्ये एनआरसी , सीएए, एनआरपी, सारखे आंदोलन असेल आणि आता निजामुद्दीन मरकज जमात प्रकरण असेल यामध्ये मुस्लिम धर्मीयांना जाणुन बुजून ट्रोल केले जाते, बदनामी केली जाते आणि वास्तविक परिस्थिती वेगळी असते, याला केंद्र सरकार जबाबदार आहे हे माहीत असतानासुद्धा बदनाम केले जात आहे. असे अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत . 
           सगळ्यात जास्त कुठल्या राजकीय पक्षांचा आयटी सेल हा सक्रिय असतो तो म्हणजे धर्माधिष्ठीत राजकारण करणारे आणि इतर समविचारी संघटनेचे लोक व त्यांना या सोशियल मीडियाचा फायदा भरपूर झाला म्हणजे 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत याचा परिणाम सर्वांनी पाहीला आहे. 2014 नंतर मोदी देशाचे पंतप्रधान झाले. सोशियल मीडियाला वापरकर्ते खूप मिळाले आणि यातुन भक्त या प्रकाराचा उदय झाला. आयटी सेलला आधीक बळ मिळले व मागच्या 6 वर्षात प्रतिगामी विचाराच्या सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पुरोगामी विचारांच्या लोकांना नाहक त्रास देण्याच व त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खालच्या दर्जाच्या अश्लील व शिवराळ  भाषेच्या प्रकारात (पोस्ट  व्हीडीओ,मीम फोटो इ. ) टाकल्याचे दिसुन येते. आणि मोदी सरकारच्या काळात तर जे कोणी मोदीच्या धोरणात्मक निर्णय व वैचारिक बाबीच्या गोष्टीचा विरोध करत असतील तर त्यांचा आवाज दाबण्याचा व त्यांना सोशियल मिडीयावर ट्रोल करून मानसिक व इतर प्रकारचा त्रास देण्याच  काम करण्यात आले . ही दाहक वास्तव  परिस्थिती आहे .
कालचा महाराष्ट्रातला सोशल मीडियावरील प्रकार हा इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी दाखवला पण त्यात किती तथ्य आहे माहिती नाही व या मध्ये महाराष्ट्राचे गृह निर्माण मंत्री मा. ना. जीतेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करण्यात आला की त्याच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला सोशल मीडियावर मंत्री महोदय च्या विरोधात अाक्षेपहार्य पोस्ट टाकल्या मुळे त्याला बेदम मारहान करण्यात आलीे. पण हे असे मारले असेल तर ते कायद्याने गुन्हा आहे. ते योग्य नाही.
परंतू ज्या इसमाने (व्यक्तीने) अाक्षेपहार्य पोस्ट टाकली त्यांनी आशा प्रकारची पोस्ट करणे चुकीच आहे, नैतिकतेने बरोबर नाही व या आधी त्यांनी अशा बर्‍याच अपेक्षाहार्य पोस्ट टाकलेल्या असल्याचे आवाड यांचे समर्थक सांगत आहेत, त्यामुळे म्हटले जाते की शब्द हे शस्त्र आहेत ते जपुनच वापरले पाहिजेत, नसता अनेकदा वादंग होताना दिसतात.  महत्व पुर्ण भाग म्हणजे जे आता मंत्री महोदयावर भक्त परिवार टिका करत आहे, तो त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि टिका करताना म्हणतात की आता संविधान आठवत नाही का..? आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवत नाही का...?  कायद्याच राज्य कुठे आहे....? हे प्रश्न विचारात आहेत. ज्यावेळी तुम्हाला बाकीचे पुरोगामी लोक हेच प्रश्न विचारत होते तेव्हा तुमचे उत्तर आठवा . आणि आता प्रतिगामी संविधाची व न्यायाची भाषा करत आहेत त्यापैकी बरेच मागच्या 6 वर्षापासून लोकांचा आवाज दाबत होते, ज्या व्यक्ती भाजप  सरकारच्या विरोधात बोलत होते, लिहीत होते अशा लोकांना देशद्रोही म्हणून त्यांच्यावर थेट खटले चालवणारे आणि त्यांचे व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त करणारे,  विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करणारे आणि बेदम मारहाण करणारे, आई बहिणीच्या नावाने अश्लील शिव्या देणारे व विचारवंतांची हत्या करणाऱ्यांचे समर्थन करणारे, ज्यांनी विरोध दर्शवला त्याच्या मानसिक छळ करणारे, इडी सीबीआय मागे लावण्याची भाषा बोलून बदनामी करणारे व गायीच्या नावावर कित्येक निरपराध लोकांची हत्या करणारे व मॉबलीचींगच्या आडून विरोधाकांना भिती दाखवणारे लोक आज संविधानाची भाषा बोलतात हे किती हास्यास्पद आहे, त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यावे "जैसी करणी, वैसी भरणी" जे कराल त्याचे तसेच परिणाम मिळतील. 
त्यामुळे सांगावे वाटते सोशियल मीडियाचा चांगला वापर करा, विधायक कामासाठी त्याचा उपयोग करा, शब्द अतिशय जुन वापरावेत कुणाला नाहक त्रास देऊ नये कोणाच्या आई बहिणीच्या नावाने अश्लील शिव्या देऊ नयेत आणि अफवा, चुकीचे संदेश पसरवू नयेत, एवढे पथ्य जरी आपण पाळले तरी समाजीक शांतता व कायदा, सुव्यवस्था अबाधित राहिल आणि कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाहीत. 
- ओम पुरी
(मो.9168916862 
Email-
Ompuri9168@gmail.com
विभाग - M.A. अर्थशास्त्र , M.A.M.C.J जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)

3 comments: