तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

बचतगटाच्या तेजस्वीनी काळे यांचा मदतीचा हात


वाशिम(फुलचंद भगत)-कोरोना व्हायरसच्या या युद्धात बचत गटाच्या महिलांनीही पुढाकार घेतला असुन तेजस्वीनी काळे यांच्या नेतृत्वात गरीबांना मदत करणे सुरु आहे.बचत गटाच्या  महिला सध्या  अनोखी मदत करत आहेत. आप आपल्या घरातील धान्य देतात गरजुवंत नागरिकांकरीता देवुन सहकार्य करत आहेत.श्री गणेश स्वयम सहायता समुह महिला बचत गट शेलुबाजारच्या  अध्यक्षा शारदा रवने व  यांच्या समुहा कडून कोरोना महामारिच्या या युद्धात गरीब गरजुवंत नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळावे या करीता ५० किलो तांदुळ राजमुद्रा ग्रुप शेलुबाजार यांच्या स्वाधीन केले व गरजुवंताना द्यावे ही विनंती केली. यावेळी तेजस्विनी काळे, जयश्री लकडे यांची उपस्तिथि होती.
राजमुद्रा ग्रुप या दानशुर व्यक्तिमहत्व असलेल्या सर्व समुहाचे व यांच्या सहकार्यान्चे आभारी आहे असे गृपकडुन सांगन्यात आले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a Comment