तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

परळीत अडकलेल्या परराज्यातील ऊसतोड मजुरांना श्री.वैजनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे शिधावाटप


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
परराज्यातील मौजे मेडिगुडा (तेलंगना)राज्यातील ०५ ऊसतोड मजुर मौजे सरफराजपुर ता.परळी वै.येथे काही दिवसापासुन अडकले आहेत. त्यांना राशनची कुठलीच  सुविधा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती याची माहिती परळीचे तहसिलदार डॉ.विपीन पाटील साहेब यांना कळाली असता त्यांनी वैजनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे शिधावाटपा करण्यात यावा असे कळवले व तातडीने आज दि.२६-०४-२०२० रोजी सकाळी ६:३०वा. परळी वै.तालुक्यातील मौजे.सरफराजपुर येथे जाऊन त्या ०५ ऊसतोड मजुर कुंटुबांना शिधावाटप करण्यात आला. यावेळी श्री.वैजनाथ देवस्थांन कमिटीचे सेक्रेटरी श्री.राजेशजी देशमुख, विश्वस्त प्रा.बाबासाहेब देशमुख सर, तलाठी व्हि.जे.पंडीत साहेब,सेवेकरी श्रीपाद कुलकर्णी,चालक बालाजी सावंत आदी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment