तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानचा मदतयज्ञ अविरत सुरूच! ; शहरासह ग्रामीण भागात ३० हजार कुटुंबांना वाटले जीवनावश्यक वस्तूंचे किट


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान च्या वतीने परळी मतदारसंघात लोक डाउन च्या काळात सुरु असलेला मदतीचा यज्ञ घरोघरी पोहोचला असून शहर व ग्रामीण भागात आतापर्यंत जवळपास ३० हजार कुटुंबांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या या लढ्यात नाथ प्रतिष्ठान बहुमोल योगदान देत आह. पहिल्या टप्प्यात परळी शहरातील हातावर पोट असलेल्या गरजु नागरिकांना प्रभागनिहाय यादी करून जीवनावश्यक साहित्याचे किट ज्या मध्ये तांदूळ डाळी साखर, तेल, मीठ, तिखट, हळद, चहापत्ती आदी सामुग्री असणारे साहित्य वाटप करण्यात आले.

दुसऱ्या टप्प्या मध्ये ग्रामीण भागामध्ये मागेल त्या घटकांपर्यंत  नाथ प्रतिष्ठान सामुग्री वितरित करीत आहे. नाभिक समाजातील लॉकडाउन मुळे सलून बंद असल्यामुळे गरजूंना मदतकार्य देणे गरजेचे होते, त्याच प्रमाणे हातगाडा चालक, हातरीक्षाचालक, हॉस्पिटलमध्ये काम करणारे आरोग्यसेवक कंपाउंडर, स्वीपर तसेच इतर कर्मचारी वृन्द यांनाही किराणा किट देण्यात आले.

परळी शहराच्या लगतच्या वस्ती शाहूनगर, राहुल नगर, रामनगर, युसुफीया कॉलनी,बसवेश्वर कॉलनी, भिमनगर आदी भागात सुद्धा प्रत्येक घरोघरी वितरण करण्यात आलेले आहे. पुढील काळात मागेल त्याला मदत याप्रमाणे अविरत मदतकार्य सुरू आहे.

 यासाठी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नाथ प्रतिष्ठान चे सचिव नितीन कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी मदत पोचवण्यासाठी नियोजन करत आहेत.

परळी बाहेरही मदतकार्य सुरूच!

मतदारसंघातील विविध ठिकाणी अडकलेल्या अनेकांनी फोनवरून व विविध माध्यमातून मदत मागीतल्यानंतर ना. मुंडेंनी विविध माध्यमातून पुणे, मुंबई इतकेच नव्हे तर इतर राज्यातही अनेक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना विविध माध्यमातून ना. मुंडेंच्या वतीने गरजूंना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले आहेत.

पुणे शहरात मराठवाडा हॉटेल व पिंपरी चिंचवड अशा दोन ठिकाणी लॉकडाऊन मुळे अडकलेल्या २०० विद्यार्थ्यांसाठी नाथ प्रतिष्ठान व धनंजय मुंडे मित्र मंडळाच्या वतीने मोफत जेवणाचे डबे पुरवले जातात.

No comments:

Post a comment