तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

हिंगोलीचे खा.हेमंत पाटील यांच्यावतीने वृत्तपत्र वाटप करणा-यांना धान्यकीटचे वाटप
हिंगोली/प्रतिनिधी:- एप्रिल,कोरोना विषाणुच्या संसर्गाने संपुर्ण जगासह भारत लाॅकडाऊन झाले आहे.यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत गेल्या महिन्यापासून वर्तमान पत्राची छपाई बंद झाल्याने वृत्तपत्रे वाटप करणा-यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे खासदार हेमंत पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दि.20 एप्रिल सोमवार रोजी मान्यवरांच्या उपस्थित वृत्तपत्रे विक्रेते,वाटप करणा-या सुमारे 50 जणांना धान्यकिटचे वाटप केले.
हिंगोली शहरात दररोज सुमारे 50 जण वृत्तपत्रे विक्री करून आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवितात पण कोरोना विषाणुचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकार ने गेल्या महिनाभरापासुन लाॅकडाऊन केल्याने व वृत्तपत्राची छपाई बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.हि बाब हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दि.20 एप्रिल सोमवार रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह परीसरात सोशल डिस्टीनसिंगचे सर्व नियम नियम पाळुन सुमारे 50 जणांना धान्यकिटचे वाटप खा.हेमंत पाटिल व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.यावेळी माजी खासदार अॅड.शिवाजीराव माने,भैया पाटील गोरेगावकर,उपजिल्हाप्रमुख सुनिल काळे,शिवसेना जिल्हा समन्वय दिलीप बांगर,हिंगोली चे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण,वसमत चे नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार,जि.प.सदस्य माऊली झटे,डाॅ.सोमेश्वर पतंगे,रवि नादरे,किशोर मास्ट,बाबा अफुणे,उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे,हिंगोलीचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह पत्रकार बांधव,वृत्तपत्र वितरक सुभाष अपुर्वा,राजेंद्र हलवाई,संदीप पाचमासे यांच्यासह वर्तमान पत्र विक्रेते युवक उपस्थित होते.

No comments:

Post a comment