तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

कोरोना रोखण्यासाठी चांदापूर ग्रामपंचायत सुरक्षेबाबत अग्रेसर असून परिसरात निर्जंतुकीकरण औषध फवारणी ; नागरिकांनी आपल्या आरोग्य काळजी घ्यावी- श्रीहरी गित्तेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गमुळे चिंताग्रस्त आहेत. संपूर्ण देशात लाँकडाऊन व संचारबंदी आहे. कोरोना रोखण्यासाठी चांदापूर ग्रामपंचायत सुरक्षेबाबत अग्रेसर असून परिसरात निर्जंतुकीकरण औषध फवारणी तसेच वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच  गावातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन श्रीहरी गित्ते यांनी केले आहे.

देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या लाँकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. देशासह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परळी तालुक्यातील चांदापूर ग्रामपंचायतीने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना रोगाचे संक्रमण आपल्या विभागात होऊ नये म्हणून  ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांमध्ये सोडियम हायड्रोक्लोरिक निर्जंतुक औषध फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.  गावातील परिसर हा निर्जंतुक व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीहरी गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी हे वेळोवेळी प्रयत्न करीत आहेत. निर्जंतुकीकरणाची फवारणी करत असताना औषध फवारणी ही योग्यरित्या होत असल्याचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीहरी गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली  सरपंच भामाबाई  किशन हानवते व ग्रामसेवक अनिल हजारे यांच्या सह विभागातील सदस्य यांनी घेतला असून निर्जंतुकीकरण आणि सुरक्षेबाबत चांदापूर ग्रामपंचायत अग्रेसर असल्याचे दिसून येते. 
    कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळकटी देण्यासाठीआहे. आज संपूर्ण देश एकजुटीने कोरोना विरुद्ध लढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये,घरात रहा सुरक्षित रहा,शासनास सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a comment