तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 April 2020

" चित्रकलेच्या माध्यमातून बच्चे कंपनीची कोरोना जनजागृती "


(अनुज केसरकर)
मीरा रोड पूर्व येथील कनकिया सिनेमॅक्सच्या जवळपास रश्मी हेतल - वाय झेड , फेज २ हौसिंग सोसायटीतील सौ. दीपा सुर यांनी घरीच राहून सोसायटीच्या बच्चे कंपनीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला घरात राहण्याचे आवाहन करण्यासाठी आॅनलाईन चित्रकलेच्या स्पर्धेचे आयोजन केले . या सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्व पालकांनी सौ. दीपा सुर यांच्या संकल्पनेतील आॅनलाईन चित्रकला स्पर्धेला पाठिंबा देऊन घरीच राहून आपल्या छोट्या मुलांना मार्गदर्शन करून   ' स्टे होम अॅन्ड किप फेथ   एव्हरीथींग विल गेट बेटर ' , ' मेंटेंन सोशल डिस्टंसिंग  '  , फाॅलो द प्रिकाॅशंन्स , ' लेट्स फाईट कोरोना  '  ' सेल्फ केयर इज नाॅट सेल्फिश . यू कॅन नॉट सरव्ह फ्राॅम अॅन एमटी व्हेसल ' असे संदेश देणारे फलक , चित्र , काढण्यास सांगितले . कोरोना जनजागृती सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी ३ ते ५ वयोगटातील बच्चे कंपनीने प्रचंड प्रतिसाद दिला . या आॅनलाईन चित्रकलेच्या स्पर्धेत ह्रिदया , सर्वग्या , श्रावणी , रेहांशी , मिश्का , हर्षिनी , माही , विहा , अध्यान , रोंनोजाॅय , माधव ,लकश्य ,सार्थक , विराली , विहान , रिशू , कुशल , मंथन , सुप्रग्या , दिशांत , रिया , माही , अन्यन्या , सुहानी , आयुश , समरिध्दी , वेदांत , सुहानी , सोहम , खुशी , या मुला- मुलींनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आणि " हम किसी से कम नहीं " आम्ही पण कोरोनाला हलविण्याच्या लढ्यात सहभागी आहोत हे जगाला दाखवून दिले आहे .  या सर्व चिमुरड्यांवर मिरा भाईंदर विभागातील विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे .

No comments:

Post a comment